खेड प्रतिनिधी: खेड तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडगाव पाटोळे येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. बिबट्याने मागील काही वर्षात वन हद्द ओलांडून नागरिक वस्तीत झेप घेतली असल्याचे मागील अनेक घटनांमधून समोर येत आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर वनक्षेत्र विभागात सन २०२० सालात एकुण ४७ जनावरांवर वन्यप्राण्यांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते जुन २०२१ अखेर १४ जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना विविध भागात घडल्याच्या नोंदी वनविभागाकडे झाल्या आहेत. वनविभागाची जबाबदारी वाढलेली असताना येथे अधिकारी मात्र उपलब्ध नाहीत. राजगुरुनगर वनविभाग खेड क्रमांक १ या कार्यालयाचा कारभार गेली सात महिन्यापासून रामभरोसे असल्याचे पहावयास मिळत आहे.
समर्थ भारत माध्यम समूह