समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे
माजी पालघर जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचं (वय ४९) आज सकाळी करोनानं निधन
झालं. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी,
दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर
गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांची
अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आलं. तिथं
त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारांना यश आलं नाही. उपचारादरम्यान आज सकाळी
त्यांची प्राणज्योत मालवली.
कालच भाजप जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण
वरखंडे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं करोनामुळे
निधन झाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.