Skip to main content

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत, पत्रकाराच्या खुनाशी संबंधांचा आरोप

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:




राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी आला आहे.

सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत.

कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, राहुरीतील १८ एकर भूखंडाच्या मालकीसंबंधी दातीर सतत तक्रार अर्ज करून अडचणी वाढवत असल्याने त्यांची हत्या केली, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे आम्ही या भूखंडाची माहिती मिळविली. तेव्हा कळाले की हा भूखंड पठारे नावाच्या एका शेतकऱ्याच्या नावावर आहे. मात्र नगरपालिकेने तेथे आरक्षण टाकले होते. नंतर हे आरक्षण उठविण्यात आले. त्या जागेत आता सोहम ट्रॅन्सपोर्ट कंपनी आहे. ही कंपनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नावे असून सोहम त्यांच्या मुलाचे नाव आहे. या कंपनीत तनपुरे यांचे मेहुणे देशमुख आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हे भागीदार आहेत. दातीर यांना पठारे कुटुंबीयांनी मुखत्यारपत्र दिले होते. त्या आधारे दातीर या भूखंडासाठी कायदेशीर लढाई लढत होते. यावरून त्यांना मोरे यांच्याकडून अनेकदा धमक्या आल्या होत्या. दातीर यांच्या पत्नीने पोलिसांत तशी तक्रारही दिली होती. मोरे याच्या विरुद्ध दातीर यांनीही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नाही. दातीर यांना संरक्षणही दिले नाही. १८ एकरची मालमत्ता लाटण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असेल.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...