समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण
महाराष्ट्राला घेरले आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. पण सध्या राज्याचे
राजकारण हे लसीभोवती फिरताना दिसत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा छळ करत असल्याचा
आऱोप राज्यातील सत्ताधारी करत आहेत. तर आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर
आरोप करत असल्याचे विरोधक म्हणतायत. पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आता केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता
आहे, तिथेच लसीचे ज्यादा डोस मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे
पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी एक ट्विट केले आहे आणि म्हटले आहे की, पंतप्रधान
यांनी खास पुणेकरांसाठी २ लाख ४८ हजार कोरोना लस देण्याचा निर्णय घेतलाय. #पुणे शहराचे
खासदार पंगिरीशबाबत यांच्या पाठपुराव्याचं हे यश आहे. मी केंद्राचे सर्व पुणेकरांच्या
वतीने आभार मानतो.
यावर भाजपच्या काही समर्थकांनी निर्णयाचे स्वागत
केले आहे, पण काही शिवसेने रघुनाथ कुचिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, "ही
राजकीय क्रूरता केवळ पुणेच का ? महाराष्ट्र वडिलकींच्या भावनेतुन परोपकाराची भूमिका
आजपर्यंत बजावत आला. परराज्यातील कुठला ज़िल्हा, गांव नसेल, की तेथील माणुस ईथ पोट
भरत नाही. त्यांच्या चुकीची क़ीमत आज राज्य भोगतंय संसर्ग का वाढ़ला ? तर केवळ मुक्त
संचारामुळेच पहा उत्तर मिळेल याचं?"