घोडेगाव प्रतिनिधी:
आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना घोडेगावचे अध्यक्ष गणेश गावडे यांची आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सीटु) महाराष्ट्र राज्य, यांच्या ठाणे विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आल्याची माहिती राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. दि. १० एप्रिल 2021 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश गावडे हे खेड
तालुक्यातील कोहिंडे खुर्द येथील माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक पदी कार्यरत
असून दुर्गम भागातील आदिवासी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून
विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय काम करत आहेत. आश्रमशाळा आधुनिक दृष्ट्या
प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेऊन शाळेला आयएसओ मानांकन
प्राप्त करून दिले. याप्रसंगी आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा शिक्षक व
कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, राज्य
कार्याध्यक्ष एस. जे. शेवाळे, घोडेगाव प्रकल्प उपाध्यक्ष दादासाहेब सितापुरे,
कार्याध्यक्ष पांडुरंग माळी, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव चंद्रकांत नाईकडे,
सहसचिव नवनाथ भवारी, जीवन वाडेकर, बी. बी. शिंदे आदी उपस्थित होते.