आंबेगाव प्रतिनिधी:
शिंगवे पारगाव ता. आंबेगाव येथे श्री भैरवनाथ मंदिरासमोरील सभामंडपात कोविड लसीकरणाला शनिवार दि.१० रोजी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.या तिसर्या दिवशी ती १७१ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे.
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या
प्रमाणात वाढत असून
कोविड लसीकरण करून
घ्यावे असे आवाहन
शासनाच्या वतीने करण्यात आले
आहे. या आवाहनाला
शिंगवे गावातील ४५ वयाच्या वरील नागरिकांनी
प्रतिसाद दिला असून
पहिल्याच दिवशी १७१नागरिकांनी कोविड
लस घेतली आहे.
नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे
यासाठी शिंगवे ग्रामपंचायत व
आरोग्य विभागाच्या वतीने गावात
जनजागृती करण्यात आली होती.तसेच सोशल
मिडिया च्या माध्यमातून
लस घेण्याबाबत आवाहन
करण्यात आले होते.
हे लसीकरण पार
पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व
आरोग्य विभाग प्रशासनाचे मोलाचे
सहकार्य लाभले असल्याचे नागरिकांनी
सांगितले.
गावात आज १७१
नागरिकांनी लसीकरण केले असून
पुढील काही दिवसात
इतरही नागरिकांना लसीकरण
करण्यात येणार असून नागरिकांनी
लसीबाबत कोणतीही भीती मनात
न बाळगता लसीकरण
करून घ्यावे असे
आव्हान आरोग्य विभागाच्या वतीने
करण्यात आले आहे.