समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी
उर्फ भिडे यांनी नुकतंच कोरोना बाबत आक्षेपार्य वक्तव्य केलं होतं. "मुळात कोरोना
हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची
नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.'' असं बेजबाबदार वक्तव्य
केलं होतं.
भिडेंच्या या बेजबाबदार वक्तव्यावर आज जलसंपदा मंत्री सांगलीचे
पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
भिडे यांचं वक्तव्य निषेधार्य
आहे. भिडेंच्या वक्तव्याचा तपास केला जाईल, आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई
केली जाईल. अशी माहिती जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली
आहे. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हटलं होतं भिडे यांनी…
सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी…
मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना
हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला
रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे. असं अकलेचे तारे तोडणारे वक्तव्य भिडे
यांनी केलं होतं. या अगोदर देखील भिडे यांनी अशी वक्तव्य केली आहेत.
मागे एकदा सांगली जिल्ह्यातील आळसंद या गावात आमदार अनिल
बाबर तसेच संभाजी भिडे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी एकत्र आले होते. यावेळी
भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन
करा असे फर्मावलं होतं.
आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या
तोंडावरचा मास्क उतरवला. गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क
घातलेला नव्हता. व त्यांनी आमदारांना घातलेला मास्क देखील उतरवायला लावला होता.
भिडे यांनी मध्यंतरी माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं
झाली असा दावा केला होता.
"भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे." या गंभीर वक्तव्यावर देखील कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळं आता कारवाई होणार की पालकमंत्र्यांचे शब्द हवेत विरणार? येणारा काळच ठरवेल.