Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

दहावी- बारावीच्या परीक्षा लांबणीवर

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राज्यभरातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये होईल तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावी-बारावी परीक्षांचं काय होणार? अशी टांगती तलवार विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यावर होती. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं.  राज्य शिक्षण मंडळाच्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार होत्या. मात्र आता या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली आहे. 11 एप्रिल रोजी एमपीएससीची जी परीक्षा होणार होती ती झालेली नाही. परीक्षेच्या दोन दिवस आधी ती पुढे ढकलण्यात आली.  याच धर्तीवर बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेतला जाणार? असा...

भिडेवर कायदेशीर कारवाई करणार- जयंत पाटील

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ भिडे यांनी नुकतंच कोरोना बाबत आक्षेपार्य वक्तव्य केलं होतं. "मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.'' असं बेजबाबदार वक्तव्य केलं होतं. 

 भिडेंच्या या बेजबाबदार वक्तव्यावर आज जलसंपदा मंत्री सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. 

 भिडे यांचं वक्तव्य निषेधार्य आहे. भिडेंच्या वक्तव्याचा तपास केला जाईल, आणि त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती जलसंपदामंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

 काय म्हटलं होतं भिडे यांनी… 

 सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी… 
 
 मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे. असं अकलेचे तारे तोडणारे वक्तव्य भिडे यांनी केलं होतं. या अगोदर देखील भिडे यांनी...

राज्यात संपूर्ण लॉकडाउन नकोच, केंद्रीय पथकाचे स्पष्ट मत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: शहरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्याचे निर्बंध पुरेसे असून, पूर्ण लॉकडाउनची गरज नसल्याचे मत केंद्र सरकारच्या पथकाने व्यक्त केले आहे. या पथकाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये  कोरोना  संकट हाताळणीबाबत पुण्याच्या स्थानिक यंत्रणांचा केंद्र व राज्य सरकारशी असलेल्या समन्वयावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोना चा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 'करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध पुरेसे आहेत. पूर्ण लॉकडाउनची गरज नाही,' असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कोरोना च्या प्रादुर्भावाचा अंदाज न आल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, गेल्या दोन महिन्यांत दोन्ही महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा कालावधी असतानाही फारशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. शहरातील करोना चाचण्यांची क्षमता वाढलेली नाही. 'ए...

केंद्राचा मोठा निर्णय रेमडीसीवीरची निर्यात थांबवणार, राजेश टोपेंनी केलं स्वागत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: रेमडीसीवीर इंजेक्शन तुटवड्यामुळे केंद्रसरकारने त्याची निर्यात थांबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह असून त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसीवीर उपलब्ध होण्यास मदत होईल . असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे . महाराष्ट्रातील रेमडीसीवीरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी . अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती . काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रेमडीसीवीर उत्पादकांची बैठकही घेतली होती . त्यावेळी निर्यात थांबविण्याच्या मुद्दयावर चर्चा करण्यात झाली होती . आज केंद्र सरकारने निर्यात थांबविण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे असेही राजेश टोपे म्हणाले .

मुंबईत खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मिळणार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आता खासगी हॉस्पिटल्समध्ये लस मिळणार आहे . महानगरपालिकेला कोविड - १९ लसीचा साठा उपलब्ध झाल्याने सोमवार म्हणजेच १२ एप्रिल २०२१ पासून मुंबईतील ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे . मुंबई महानगरपालिका आणि शासनातर्फे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत . या सर्व केंद्रांवर मिळून महानगरपालिका क्षेत्रात दरदिवशी सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते . मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या ७१ खासगी रुग्णालयात , शनिवार , दिनांक १० एप्रिल २०२१ आणि रविवार , दिनांक ११ एप्रिल २०२१ असे दोन दिवस लसीकरण थांबले होते . पण मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते . लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु केले जाईल , असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते . शुक्रवार , द...

भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं करोनाने निधन

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्हाध्यक्ष  पास्कल धनारे  यांचं (वय ४९) आज सकाळी करोनानं निधन झालं. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारांना यश आलं नाही. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. कालच भाजप जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं करोनामुळे निधन झाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गणेश गावडे यांची शासकीय आश्रमशाळा संघटनेच्या ठाणे विभाग अध्यक्षपदी निवड

घोडेगाव प्रतिनिधी: आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना घोडेगावचे अध्यक्ष गणेश गावडे यांची  आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सीटु) महाराष्ट्र राज्य, यांच्या ठाणे विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आल्याची माहिती राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली. दि. १० एप्रिल 2021 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेश गावडे हे खेड तालुक्यातील कोहिंडे खुर्द येथील माध्यमिक आश्रमशाळेत मुख्याध्यापक पदी कार्यरत असून दुर्गम भागातील आदिवासी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय काम करत आहेत. आश्रमशाळा आधुनिक दृष्ट्या प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी विशेष परीश्रम घेऊन शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त करून दिले. याप्रसंगी आदिवासी विकास विभाग आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, राज्य कार्याध्यक्ष एस. जे. शेवाळे, घोडेगाव प्रकल्प उपाध्यक्ष दादासाहेब सितापुरे, कार्याध्यक्ष पांडुरंग माळी, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव चंद्रकांत नाईकडे, सहसचि...

शिंगवे (पारगाव) येथे लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आंबेगाव प्रतिनिधी: शिंगवे पारगाव ता. आंबेगाव येथे श्री भैरवनाथ मंदिरासमोरील सभामंडपात  कोविड लसीकरणाला शनिवार दि.१० रोजी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.या तिसर्‍या दिवशी ती १७१ नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या आवाहनाला शिंगवे गावातील ४५ वयाच्या   वरील   नागरिकांनी प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी १७१नागरिकांनी कोविड लस घेतली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी शिंगवे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने गावात जनजागृती करण्यात आली होती.तसेच सोशल मिडिया च्या माध्यमातून लस घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. हे लसीकरण पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावात आज १७१ नागरिकांनी लसीकरण केले असून पुढील काही दिवसात इतरही नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी लसीबाबत कोणतीही भीती मनात न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आव्हान आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात...

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत, पत्रकाराच्या खुनाशी संबंधांचा आरोप

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राहुरी येथील एका सप्ताहिकाचे पत्रकार  रोहिदास दातीर यांच्या हत्याप्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. पोलिस तपासाचा हवाला देत ही हत्या भूखंड प्रकरणातून झाली असून तो भूखंड ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कंपनीशी संबंधित आहे. या भूखंडासंबंधी तक्रारी करून अडथळा आणत असल्यानेच दातीर यांची हत्या झाली आहे, त्यासंबंधीचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे. कर्डिले यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणी आला आहे. सहा एप्रिलला राहुरीत पत्रकार दातीर यांचे अपहरण करून हत्या झाली होती. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. पोलिसांचा तपास सुरू असताना या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राहुरीचे माजी आमदार कर्डिले यासंबंधी शनिवारी पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या घटनेसंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. कर्डिले म्हणाले, ‘पत्रकार दातीर यांच्या हत्येची आम्ही बारकाईने माहिती घेतली. यातील दोन ...

लसीकरणही पक्षीय नियंत्रणात, लोकशाहीला धोका

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्राला घेरले आहे. राज्यात दररोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. पण सध्या राज्याचे राजकारण हे लसीभोवती फिरताना दिसत आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचा छळ करत असल्याचा आऱोप राज्यातील सत्ताधारी करत आहेत. तर आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर आरोप करत असल्याचे विरोधक म्हणतायत. पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची राज्यात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आहे, तिथेच लसीचे ज्यादा डोस मिळणार का असा सवाल निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी एक ट्विट केले आहे आणि म्हटले आहे की, पंतप्रधान यांनी खास पुणेकरांसाठी २ लाख ४८ हजार कोरोना लस देण्याचा निर्णय घेतलाय. #पुणे शहराचे खासदार पंगिरीशबाबत यांच्या पाठपुराव्याचं हे यश आहे. मी केंद्राचे सर्व पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यावर भाजपच्या काही समर्थकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे, पण काही शिवसेने रघुनाथ कुचिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, "ही राजकीय क्रूरता केवळ पुणेच का ? महाराष्ट्र वडि...

मोहन भागवत यांना कोरोना, अमोल मिटकरी म्हणाले आता भिडे गुरुजींना विचारा!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी अकलेचे तारे तोडत " मुळात कोरोना हा रोग नाही . कोरोना हा मानसिक आजार आहे . कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत . कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे .'' 

 असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं होते . यावर अमोल मिटकरी यांनी भिडेंवर निशाणा साधला आहे . 

 मागे एकदा सांगली जिल्ह्यातील आळसंद या गावात आमदार अनिल बाबर तसेच संभाजी भिडे एका दुकानाच्या उद्घाटन समारंभासाठी एकत्र आले होते . यावेळी भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन करा असे फर्मावले . आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या तोंडावरचा मास्क उतरवला . गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क घातलेला नव्हता . व त्यांनी आमदारांना घातलेला मास्क देखील उतरवायला लावला होता . राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे . नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आ...