समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे हे आंधळ दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय असा प्रकार झाला आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे, ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याच्या लुटीची ३पक्षांची शर्यत सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पोलीस खात्याला बदनाम करण्याचे काम या महाविकास आघाडीने केले आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकले नाही आणि दुसरीकडे शेती पंपाची आणि पिण्याची पाण्याचे वीज कनेक्शन कट करत आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना लवकरच राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करणार आहे.. असेही त्यांनी सांगितले आहे.