जुन्नर प्रतिनिधी:
संगमनेर सह जुन्नर तालुक्यात
भूकंपाचे सौम्य धक्के 46 रिष्टर स्केलची नोंद संगमनेर तालुक्यातील
घारगाव, बोटा, माळवाडी व कुरकुटवाडी, आंबी, दुमाला, केळवाडी, अकलापुर तसेच संगमनेर
तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जुन्नर तालुक्यातील आळे, आळेफाटा, वडगाव आनंद, पिंपळवंडी
आणि परिसरातील गावांना गुरुवार 25 मार्च रोजी 4.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे
वातावरण पसरले आहे.
याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला
असता त्यांनी हा भूकंपाचा धक्का 46 रिष्टर स्केलचा असल्याची माहिती तहसलदार अमोल निकम
यांनी दिली