समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर
भारतीय
जनता
पक्षानं
जोरदार
हल्ला
चढवला
आहे.
'संजय
राठोड
यांच्या
राजीनाम्याच्या वेळी संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलेलं कधी दिसलं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांची पाठराखण संजय राऊत इमानेइतबारे करताहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का?,' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी
केला
आहे.
पुण्यातील एका युवतीच्या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांचं नाव आलं होतं. या संदर्भातील ऑडिओ क्लिप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हायरल केल्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता परमबीर सिंग यांनी
भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर विरोधक गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीशामार्फत या आरोपांची चौकशी करण्याचं ठरवलं आहे. मात्र, चौकशीआधी राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. संजय राऊत विरोधकांना उत्तर देताना देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
राऊत यांच्या वक्तव्याचा दरेकर यांनी जोरदार समाचार घेतला आहे. राठोड यांच्या राजीनाम्याची आठवण देत दरेकर यांनी राऊत यांना जोरदार टोला हाणला आहे. 'संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप गंभीरच आहेत. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्यच आहे. मात्र, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. बंजारा समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा केला. या नेत्याची पाठराखण संजय राऊत यांनी केली नाही. राठोड यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची गरज नाही असं राऊत कधी बोलले नाहीत. आपल्याच नेत्याला विसरलेले राऊत आता अनिल देशमुख यांची पाठराख इमानेइतबारे करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत,' असं दरेकर यांनी म्हटलं आहे.