समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
पुणेकरांनी नियमांचं काटेकोर पालन केलं नाही, तर मात्र पुण्यात 2 एप्रिलला कठोर घेऊ असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली.
त्यानुसार, 1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसंच 50 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको, असं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी इतर नियमांची माहिती अजित पवार यांनी दिली,
- 20 लोकांमध्ये
अंतविधी करावेत.
- शाळा महाविद्यालय 31 एप्रिल पर्यंत बंद राहणार.
- संध्याकाळी सर्व बाग बंद राहणार.
- जम्बो कोव्हिडमधील सुविधा वाढवण्याचा निर्णय.
- पिंपरीचं जम्बो कोव्हिट सेंटर सुद्धा सुरू करणार.
- ससून रुग्णालयातील बेडची संख्या 300 वरून 500 बेडपर्यंत वाढवणार.
- बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होणार आहेत.
- सामूहिक होळी साजरी न
करण्याचं आवाहन
- संख्या कमी झाली नाही तर पुढच्या बैठकीत हॉटेल बंद करावे लागतील.
·
तसंच पुढच्या शुक्रवारी आढावा घेऊन लॉकडाऊन बाबत निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. संख्या कमी झाली नाही तर नाइलाजास्तव
लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
·
जिथे कोरोनाबधितांची
संख्या जास्त आहे तिथे जास्त लसीचे डोस द्यायला पाहिजेत, अशी मागणी अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे.