Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

संगमनेर सह जुन्नर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

  जुन्नर प्रतिनिधी: संगमनेर सह जुन्नर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के 46 रिष्टर स्केलची नोंद  संगमनेर तालुक्यातील घारगाव, बोटा, माळवाडी व कुरकुटवाडी, आंबी, दुमाला, केळवाडी, अकलापुर तसेच संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जुन्नर तालुक्यातील आळे, आळेफाटा, वडगाव आनंद, पिंपळवंडी आणि परिसरातील गावांना गुरुवार 25 मार्च रोजी 4.30 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.  त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी हा भूकंपाचा धक्का 46 रिष्टर स्केलचा असल्याची माहिती तहसलदार अमोल निकम यांनी दिली

बँका, रेल्वेनंतर आता राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणाची तयारी -नितीन गडकरी

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI) येत्या पाच वर्षांत महामार्गांच्या खासगीकरणाशी संबंधित योजनेवर काम करत आहे. या माध्यमातून सुमारे 1 लाख कोटी रुपये उभारण्याची तयारी केली जात आहे , अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. उद्योजकांनी या बाबतीत पुढे येऊन गुंतवणूक करून त्याचा फायदा घ्यावा , असं आवाहन यावेळी गडकरी यांनी केलं.   राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो , असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.   CII च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. बाजारात मालमत्ता विक्री किंवा लीज ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. यातून सरकारला पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य काढण्यास मदत मिळेल. उद्योग आणि सरकार यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. देशातील पायाभूत सुविधांच्या कामांना या माध्यमातून चालना मिळेल , असं गडकरी म्हणाले.  सार्वजनिक अनुदानित राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना बाजारपेठेत खासगीकरण...

नियमांचं पालन केलं नाही तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घेऊ - अजित पवार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पुणेकरांनी नियमांचं काटेकोर पालन केलं नाही , तर मात्र पुण्यात 2 एप्रिलला कठोर घेऊ असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे . पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात एक पत्रकार परिषद घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली . त्यानुसार , 1 एप्रिलपासून पुण्यातील सर्व खासगी कार्यक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे . तसंच 50 पेक्षा अधिक संख्या लग्नाला उपस्थित नको , असं आवाहन करण्यात आलं आहे .  यावेळी इतर नियमांची माहिती अजित पवार यांनी दिली , 20 लोकांमध्ये अंतविधी करावेत. शाळा महाविद्यालय 31 एप्रिल पर्यंत बंद राहणार. संध्याकाळी सर्व बाग बंद राहणार. जम्बो कोव्हिडमधील सुविधा वाढवण्याचा निर्णय. पिंपरीचं जम्बो कोव्हिट सेंटर सुद्धा सुरू करणार. ससून रुग्णालयातील बेडची संख्या 300 वरून 500 बेडपर्यंत वाढवणार. बोर्डाच्या परीक्षा मात्र ठरल्याप्रमाणेच होणार आहेत. सामूहिक होळी साजरी न करण्याचं आवाहन संख्या कमी झाली नाही तर पुढच्य...

मराठा आरक्षण प्रकरणी सुनावणी पूर्ण

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: मराठा आरक्षणाच्या खटल्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणातील निकाल राखून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत आहे. निकाल एका महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो, होळीच्या सुटीनंतर ही तारीख जाहीर करण्यात येऊ शकते, असं सांगितलं जात आहे.  102 वी घटनादुरुस्ती व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना आणि 50 टक्क्यांवर आरक्षण देण्यात यावं की नाही, या दोन मुद्द्यांवर ही सुनावणी झाली. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या अशा सर्व बाजूंनी युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाली आहे.  राज्य सरकारने 2018 मध्ये घेतलेला निर्णय घटनात्मक असल्याचं केंद्र सरकारने यामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच देशातील सात-आठ राज्यांनी आरक्षणासाठी 50 टक्क्यांच्या अटीबाबत पुनर्विलोकन करण्याची मागणी केलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  जयश्री पाटील (सदावर्ते) विरूद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र रा...

IPS रश्मी शुक्लांवर कारवाई अटळ, मुख्य सचिवांचा अहवाल सादर

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात आयपीएस   रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंग कायद्याचा गैरवापर करत शासनाची दिशाभूल केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी शक्यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली. यात त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून भारतीय टेलिग्राफ अॅक्टखाली परवानगी घेतली असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी शुक्ला यांच्याकडून शासनाने स्पष्टीकरणे देण्याचे आदेश दिले. अहवालातील तपशीलानुसार , यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्य सचिव   सीताराम कुंटे , गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्यक्तिश: भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगीरी व्यक्त केली. त्याच प्रमाणे कौटुंबिक व्यथा , विशेषत: त्यांच्या पतींचे कॅन्सरच्या आजाराने झालेले निधन आणि त्यांची मुले शिकत असल्याचे बाब त्यां...

कोरोना बाधित इम्रान खान यांनी घेतली बैठक

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील आठवड्यात करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी बैठकही घेतली. इम्रान खान यांच्यावर आता पाकिस्तानमधून टीका होत आहे. करोनाची लागण झाल्यानंतरही इम्रान खान प्रत्यक्ष बैठक कशी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दोघेही विलगीकरणात गेले होते. मात्र, इम्रान खान यांच्या बैठकीमुळे आजाराच्या गांभीर्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या बैठकीत इम्रान खान आणि बैठकीत सहभागी झालेले इतरजणांनी मास्क वापर केला होता. त्याशिवाय सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करत अंतरही ठेवले होते. मात्र, इम्रान खान यांना या बैठकीची इतकी आवश्यकता वाटत होती तर, त्यांनी ऑनलाइन बैठक करायला हवी होती, असाही सूर उमटत आहे. अनेकांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे उदाहरण दिले. त्यांनाही करोनाची बाधा झाल्यानंतर ऑनलाइन बैठका घेत देशाचे नेतृत्व केले होते. पाकिस्तानमधील राजकीय कार्यकर्ते रझा हरून यांनी म्हटले की, पंतप्रधा...

गायिका आशा भोसले यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: प्रख्यात गायिका   आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा   महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री   उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार , सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख , राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर , सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा ताईंनी आतापर्यंत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा ताई ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर आणि त्यानंतर मुंबईत आलं. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणं गायला सुरुवात केली. आशाता...

मुंबईत कोवीड हॉस्पिटलच्या आगीत 2 रुग्णांचा मृत्यू, 5 बेपत्ता

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:  ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमध्ये सनराइज हॉस्पिटलमधील 2 निष्पाप रुग्णांचे बळी गेले आहेत. परंतु आता या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय. या मॉलमध्ये नियमबाह्य पद्धतीने हे हॉस्पिटल सुरू असल्याची तक्रार याआधी इथल्या स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली होती. परंतु त्यावर कुठलीही कारवाई प्रशासनाकडून केली गेली नाही. अखेर या मॉलमध्ये लागलेल्या आगीत निष्पापांचे बळी गेले, त्याला जबाबदार कोण असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरसेविका साक्षी दळवी यांनी केली आहे. भंडारा येथील हॉस्पिटलच्या आगीची घटना ताजी असताना मुंबईतही एका हॉस्पिटलला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. भांडुपमधील ड्रीम्स मॉलला गुरूवारी रात्री आग लागली. ही आग याच मॉलमध्ये असलेल्या सनराइज हॉस्पिटलपर्यंत पोहोचली. या आगीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 रुग्णांची सुटका करण्यात आली आहे पण इतर पाच रुग्णांचा शोध सध्या अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत. ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर ही आग दुसऱ्या आणि तिसऱ्या म...

बेंढारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर संपन्न

डिंभा प्रतिनिधी: आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतून होत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना व श्री. पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोखरी, ता. आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेंढारवाडी, पो. पोखरी, ता. आंबेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ८ मार्च ते १४ मार्च २०२१ या कालावधीत पार पडले.   सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरात आदिवासी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रबोधन व्हावे म्हणून आदिवासी पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी स्वच्छता अभियान, सुसंस्कृरीत युवक, पेसा व वनह...

दहावी, बारावी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात अशक्य- शिक्षणमंत्री

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रमात ५० टक्के कपात करणे शक्य नाही,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने यापूर्वी कपात केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमानुसार परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, इयत्ता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात ५० टक्क्यांची कपात करण्याची मागणी शैक्षणिक क्षेत्रातील घटकांकडून पुढे आली होती. त्यावर गायकवाड यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. परीक्षा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना नव्याने अभ्यासक्रमात कपात शक्य नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. गायकवाड म्हणाल्या, 'करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण देण्यात अनेक अडचणी आल्या. त्यांना अपेक्षित प्रमाणात शिक्षण देता आले नाही. त्यामुळे राज्य सरकारने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली. शिक्षण विभागाला परीक्षेचे नियोजन करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी आवश्यक ...

मंत्रालयात मारहाण झालेला शेतकरी आजही न्यायाच्या प्रतीक्षेत

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता अन्याय अत्याराचारवर बोलतात. पण , ते मुख्यमंत्री असताना २३ मार्च २०१७ रोजी मला मंत्रालयात गुरासारखी मारहाण केली. खोटं बोलले. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. मी आता शपथ घेतली आहे ,`` भलं कर्जबाजारी होईल , पण मी जिवंत असेपर्यंत फडणवीसाला परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही. हा संदेश घेऊन मी महाराष्ट्रभर फिरेल ,`` असं घाटशेंद्रा , ता. कन्नड. जि. औरंगाबादचे शेतकरी रामेश्वर भुसारेंनी सांगितलं. रामेश्वर हरिभाऊ भुसारे या अल्पभुधारक शेतकऱ्यांने आपल्या एक एकर शेतात जानेवारी 2015 मध्ये शेडनेट बसवण्यासाठी स्वताजवळेचे आणि मित्रांकडून 10 लाख रूपये खर्च केले. त्या रोपवाटीकेसाठी नियोजनही केले. रोपवाटिकेचे कार्डही छापले. त्यानंतर चांगले उत्पादन घेवून आपल्या पदरात चार पैसे पडतील या आशेवर असणाऱ्या भुसारे यांनी शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली. परंतु 11 एप्रिल 2015 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपीठीने त्यांचे शेडनेट पिकासहित जमीनदोस्त झाले.आस्मानी संकटाने पुरते हादरलेल्या रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून क...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. विलास वाघ यांचं कोरोनानं निधन

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचं आज करोनानं निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातील भारती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघ यांच्या निधनामुळं आंबेडकरी विचारांचा सच्चा पाईक व प्रबोधनाच्या चळवळीचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जात‌ आणि वर्गविरहित समाजाच्या निर्मितीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय उराशी बाळगून प्रा. वाघ‌ विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांद्वारे आयुष्यभर धडपडत राहिले. या कामात येणाऱ्या संकटांना निर्भयपणे तोंड देणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इतरांसाठी आधार देणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा लौकिक होता. विलास वाघ यांचे सामाजिक काम चौफेर होते. जातिनिर्मूलन, प्रौढ शिक्षण, वसतिगृहे आणि साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन असे काम त्यांनी उभे केले होते. वेश्यांच्या मुलांसाठीही त्यांनी संस्था सुरू केली होती. दोन आश्रमशाळा, चार वसतिगृहे आणि एका महाविद्यालयाचा डोलारा वाघ यांनी उभा केला होता. मराठीतील 'सुगावा' मास...

आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय असा आहे राज्य सरकारचा कारभार - सदाभाऊ खोत

  समर्थ भारत न्यूज नेटवर्क:  राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार म्हणजे हे आंधळ दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय असा प्रकार झाला आहे , अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे , ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याच्या लुटीची ३पक्षांची शर्यत सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पोलीस खात्याला बदनाम करण्याचे काम या महाविकास आघाडीने केले आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकले नाही आणि दुसरीकडे शेती पंपाची आणि पिण्याची पाण्याचे वीज कनेक्शन कट करत आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना लवकरच राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी करणार आहे.. असेही त्यांनी सांगितले आहे.

पोलिस दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न- अजित पवार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: परमबीर सिंह यांच्या शंभर कोटीच्या आरोपानंतर पोलिस दलात ट्रान्सफर रॅकेट प्रकरणावर प्रथमच भाष्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झालेल्या फोन टॅपिंगचा अहवाल आजच गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार असल्याची दिली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत पोलिस बदल्यांच्या रॅकेटबाबत आरोप केल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार पडसाद उमटले. या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तत्कालीन गृह विभागाचे सचिव सीताराम कुंटे हे सध्या मुख्य सचिव आहेत. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा अहवाल हा सीताराम कुंटे यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अहवालामध्ये नेमकी काय कारवाई करता येईल याबाबतची माहिती असणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस खात्यातील काही लोकांनी अतिशय गंभी...

कोविड लसीकरणाच्या 'पुणे पॅटर्न'ची राज्यभरात चर्चा

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राज्यात सध्या ' कोव्हिशील्ड ' बरोबर ' कोव्हॅक्सिन ' लस देण्यात येत असून , त्यानुसार दोन्ही लशी एकाच केंद्रावर देताना त्याबाबतचे स्वतंत्र फलक लावण्यात येत आहेत. याशिवाय केंद्रावर आलेला लशींचा साठा त्याच दिवशी वापरण्यासह विविध दहा नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा ' पुणे पॅटर्न ' चर्चेत आला आहे. या लसीकरणाच्या पुणे पॅटर्नची चर्चा आता आरोग्य खात्यात होऊ लागली असून , त्याचे स्वागत होऊ लागले आहे. पुणे शहर , जिल्ह्यात सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. ' सर्व खासगी रुग्णालये , तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे , ग्रामीण रुग्णालये , जिल्हा उप रुग्णालयांमध्ये ' इविन ' आणि ' कोविन ' चे यूजर आयडी , पासवर्ड उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक कोरोना लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी ' इविन ' आणि ' कोविन ' चे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावेत. दोन्ही पोर्टलमध्ये माहिती भरण्याची , तसेच जिल्हास्तरावर रोज सकाळी दहा ते दु...

संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: अनिल देशमुख   यांच्या चौकशीसाठी त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही , असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार   संजय राऊत   यांच्यावर भारतीय जनता पक्षानं जोरदार हल्ला चढवला आहे . ' संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या वेळी संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलेलं कधी दिसलं नाही . पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांची पाठराखण संजय राऊत इमानेइतबारे करताहेत . ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत का ?,' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते   प्रवीण दरेकर   यांनी केला आहे . पुण्यातील एका युवतीच्या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संजय राठोड यांचं नाव आलं होतं . या संदर्भातील ऑडिओ क्लिप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हायरल केल्यानंतर राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता . आता   परमबीर सिंग   यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर विरोधक गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागत आहेत . मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्या...