शिरूर प्रतिनिधी:
रावडेवाडी (ता. शिरूर) येथे पोलिसांची
दारू बनवणाऱ्या दारू भट्टिवर छापा टाकून गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे
बॅरल रसायन,
दारू बनविण्याचे साहित्य असा १ लाख ३७ हजार चा मुद्देमाल जप्त
केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे
पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी माहिती दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून 25 फेब्रुवारी रोजी पावणेपाच वाजण्याचे सुमारास रावडेवाडी गावात ओढयाचे कडेला काटेरी झुडपामध्ये अर्जुन सदाशिव हिल्लाळ, सुभाष पानगे हे हातभट्टी ची दारुची भट्टी व गावठी हातभटटी दारू तयार करीत असल्याची माहिती गोपनिय बातमीदार पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळाल्यानंतर खानापुरे यांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदव काबुगडे, पोलीस अंमलदार करण सिंग जारवाल, पोलीस पोलीस अंमलदार प्रवीण पिठले, पोलीस नाईक संजू जाधव या पथकाने रावडेवाडी येथील माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले असता दारूभट्टी सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची चाहूल लागताच वरील दोघे आरोपी पळुन गेले.
त्यााठिकाणी वीस बॅरल दारू तयार करण्याचे
रसायन, 200 लिटर मापाचे कच्चे रसायन प्रत्येकी 30 रु लिटर किंमत,एक गोलाकार जर्मनची थाळी ,एक जर्मनचा
चाटु , असा एकूण एक लाख 37 हजारचा ऐवज मिळाला असून, दारू तयार
करण्याचे कच्चे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तर ही दारू भट्टी व दारू तयार
करणारे दोन्ही जण पळून गेले आहे.याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे या दोघांवर
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(c)65(d)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे पोलिस हवालदार
राजेंद्र गवारे करीत आहे.