समर्थ भारत न्युज नेटवर्क:
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय
आधिवेशन तोंडावर असताना महाविकास आघाडी सरकारला संजय राठोड प्रकरणानं अडचणीत आणलं
आहे. आता विधानपरीषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकरांनी पूजा चव्हाणची हत्या की
आत्महत्या असा सवाल उपस्थित करत राठोडांच्या राजीनाम्याची पुनश्च मागणी केली आहे.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल, पूजा चव्हाण यांची
आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तावेज उपलब्ध आहे, साक्षीदार आहे. चौकशी होत
नाही म्हणून सरकारवर दबाव भाजपा आणत आहे, असे दरेकर म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्यशासहक
म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाती घेतला पाहिजे. भारतीय जनता
पार्टी आक्रमक आहे.
पूजा
चव्हाण मृत्यूचा छेडा लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची
सुई संजय राठोड यांच्यावर आहे त्यामुळे राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व झाल्यास
मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे. असं मत विधानपरिषदेचे विरोधी
पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले.