समर्थ भारत न्युज नेटवर्क:
राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र राज्य मंडळाकडून १६ फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे एप्रिल-मे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १६ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आले होते. त्यावर आलेल्या सूचनांचे अवलोकन करून राज्य मंडळाने शुक्रवारी दहावी व बारावीचे संभाव्य वेळापत्रकच अंतिम केल्याचे जाहीर केले. अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.