शिरूर प्रतिनिधी: रावडेवाडी (ता. शिरूर) येथे पोलिसांची दारू बनवणाऱ्या दारू भट्टिवर छापा टाकून गावठी दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे बॅरल रसायन , दारू बनविण्याचे साहित्य असा १ लाख ३७ हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी माहिती दिली आहे. या कारवाई त वीस बॅरल दारू बनवण्याचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. तर दारू बनवणारे दोघेही फरार झाले आहेत. पोलीस अंमलदार करणसिंग निहालसिंग जारवाल (शिरुर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.अर्जुन सदाशिव हीलाळ (रा कवठे यमाई मुंजळवाडी , ता.शिरूर) , सुभाष पानगे (रा .निमगाव दुडे तालुका शिरूर जिल्हा पुणे)या दोघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून 25 फेब्रुवारी रोजी पावणेपाच वाजण्याचे सुमारास रावडेवाडी गावात ओढयाचे कडेला काटेरी झुडपामध्ये अर्जुन सदाशिव हिल्लाळ , सुभाष पानगे हे हा...
समर्थ भारत माध्यम समूह