Skip to main content

महिलेचे हरविलेले १० तोळे सोने शोधण्यात पोलिसांना यश, सोमनाथ वाफगावकरांची विशेष कामगिरी.


मंचर प्रतिनिधी

संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांच्या दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशन येथे एक दांपत्य अगदी केविलवाने चेहरे करून रडवेल्या चेहऱ्याने मंचर पोलीस स्टेशनचे दरवाजात उभे ठाकले. त्या वेळी सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक तुकाराम मोरे, ठाणे अंमलदार अजित मडके हे त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे नाव संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी सौ अर्चना संजय मोहिते दोघे राहणार कळंबोली मुंबई हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते त्यानंतर आज दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते.  त्यानंतर चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबई साठी रवाना झाले सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एकलहरे येथील टेबलवरच राहिली आहे. त्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा हॉटेल रविकिरण येथे येऊन पाहणी केली असता तेथे त्यांची पर्स जागेवर मिळून आली नाही म्हणून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली असता ते बसलेल्या ठिकाणचा कॅमेरा बंद असल्याने सदर कॅमेरामध्ये त्यांना कुठलीही माहिती मिळाली; नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ मंचर पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी त्यांची माहिती घेऊन सदर बाबत तत्काळ पोलीस अमलदार सोमनाथ वाफगावकर याना दिली 

सोमनाथ वाफगावकर यांनी तात्काळ तत्परता दाखवत त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्यांचे पर्स मधील मोबाईल चा नंबर हस्तगत  करून सायबर पोलिस स्टेशन येथून त्याचे लाईव्ह लोकेशन घेऊन सदर मोबाईल चाकण आळंदी फाटा ते आळंदी रोड च्या दरम्यान असल्याचे समजले त्यानंतर त्यांनी लागलीच हॉटेल रविकिरण चे मालक युवराज शेठ कानडे यांना संपर्क केला त्यावेळी त्यांनी सांगितले की आज हॉटेलमध्ये पुणे येथील एका कुटुंबीयांचे लग्न समारंभ होता त्यावेळी सोमनाथ वाफगावकर यांनी सदर लग्न प्रमुख श्री लक्ष्मण खोसे यांचा मोबाइल नंबर घेऊन त्यांना संपर्क साधून त्यांचे लोकेशन विचारले असता त्यांनी त्यांचे लोकेशन आळंदी परिसरात असलेबाबत सांगितले त्यामुळे पोलीस सोमनाथ वाफगावकर यांनी त्यांचे वऱ्हाडचे सर्व गाड्या तत्काळ तेथेच थांबणे बाबत त्यांना सूचना दिल्या आणि गाडीत सदर काळे रंगाचे पर्सची पाहणी करणे बाबत विनंती केली त्यामुळे श्री लक्ष्मण खोसे यांनी 

त्यांचे वऱ्हाडाची सर्व गाड्या रस्त्यात थांबून सर्व गाड्यांची पाहणी त्यावेळी त्यांचे लक्षात 
आले की हॉटेल मधील लग्न समारंभ संपले नंतर परत जाताना नजर चुकीने टेबल वर 
राहिलेली एक काळे रंगाची पर्स त्यांचे गाडीत आली आहे त्यानंतर त्यांनी सोमनाथ 
वाफगावकर याना संपर्क साधून त्यांची पर्स सुखरूप असलेबाबत कळविले. त्यानंतर सदर 
मोहिते दाम्पत्याने सदर श्री लक्ष्मणराव खोसे साहेब यांचे घरी जाऊन ती पर्स ताब्यात घेतली
असून त्यांचे सर्व 10 तोळे वजनाचे दागिने आणि मोबाइल फोन सुखरूप मिळाल्याने त्यांनी 
मंचर पोलीस स्टाफ आणि पोलीस अंमलदार सोमनाथ वाफगावकर तसेच श्री लक्ष्मण खोसे 
आणि महेंद्र खोसे यांचे विशेष आभार मानले त्यावेळी त्यांचे दागिने परत मिळलेले पाहून 
त्यांचे डोळ्यात आनंद अश्रू मावत नव्हते.

Attachments area

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...