मंचर प्रतिनिधी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मंचर पोलिसांच्या दैनंदिन काम चालू असताना मंचर पोलीस स्टेशन येथे एक दांपत्य अगदी केविलवाने चेहरे करून रडवेल्या चेहऱ्याने मंचर पोलीस स्टेशनचे दरवाजात उभे ठाकले. त्या वेळी सदर ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक तुकाराम मोरे, ठाणे अंमलदार अजित मडके हे त्यांचे दैनंदिन कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की त्यांचे नाव संजय बजरंग मोहिते आणि त्यांची पत्नी सौ अर्चना संजय मोहिते दोघे राहणार कळंबोली मुंबई हे दिनांक 18/12/2020 रोजी त्यांचे नातेवाइकांचे लग्नासाठी मुंबई येथून टाकळी ढोकेश्वर जिल्हा अहमदनगर येथे गेले होते त्यानंतर आज दिनांक 19/12/2020 रोजी ते लग्न समारंभ आटोपून मुंबई येथे परत जात असताना मंचर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल रविकिरण येथे कुटुंबियासह चहापान करण्यासाठी सायंकाळी 5 वाजता थांबले होते. त्यानंतर चहापान करून सदर कुटुंब त्यांचे खाजगी वाहनातून मुंबई साठी रवाना झाले सुमारे सहा ते सात किलोमीटर गेल्यानंतर अर्चना संजय मोहिते यांना आठवण झाली की त्यांची सुमारे दहा तोळे सोन्याच्या दागिने आणि मोबाईल असलेली पर्स हॉटेल रविकिरण एक...
समर्थ भारत माध्यम समूह