मंचर ( ता.आंबेगाव ) येथील मुळेवाडी रोडवर असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरांनी चोरून नेले असून सुमारे ६,०१०००/- रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत ए.टी.एम चे काम पाहणारे प्रकाश हिरामण पाटील यांनी अज्ञात चोरट्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक २६ रोजी सिक्युअर वॅल्यू कंपनीचे अमोल दिगंबर शिंदे यांनी फोनद्वारे प्रकाश पाटील यांना कळविले की, मंचर मुळेवाडी रोड वरील ॲक्सिस बँकेचे ए.टी.एम. मधून रात्री १:३५ वा. चे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमांनी सदर ए.टी.एम. चे मशीन कशाने तरी उचकटून त्यामधील असलेले कॅश रक्कमेसह उचलून चोरून नेलेले आहे, तुम्ही त्या ठिकाणी जावून आम्हाला माहीती दया असे सांगितले. त्याप्रमाणे पाटील हे लगेच मुळेवाडी रोड मंचर येथील ॲक्सिस बँकेचे ए.टी.एम. जवळ गेले व ए.टी.एम मशीन चेक केले असता समोरील काचेचा दरवाजा पुर्ण तुटलेला दिसला व आतील ए.टी.एम. मशीन उचलून नेलेले होते. तसेच ए टी एम. मशीन असलेल्या ठिकाणचा सी.सी.टी.व्ही कॅमेरा चेक केला असता त्यावर काळे रंगाचा स्प्रे मारलेला दिसला. सदरबाबत खात्री करून पाटील यांनी आमचे ए.जी.एस....
समर्थ भारत माध्यम समूह