आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या बॅक वॉटर ला असणाऱ्या फुलवडे या गावामध्ये कातकरी समाजाची सतरा कुटुंबं वास्तव्याला आहेत. या समाजच्या लोकांकडे राहायला घर तर नाहीच शिवाय यांच्याकडे शेतीही नाही. आपल्या कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणे आणि धरणात मासेमारी याशिवाय यांच्याकडे काहीच पर्याय नाही. वर्षानुवर्षांच्या दारिद्र्यामुळे बचतीचा तर प्रश्नच नाही.
उन्हाळ्यात धरणातील पाणी कमी झाल्याने मासे मिळत नाहीत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लोकडाऊन सुरू आहे त्यामुळे कुठे कामही मिळत नाही. या सर्व परिस्थितीमुळे या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हा सर्व प्रकार याच गावातील आश्रम शाळेत नोकरी करणाऱ्या एका शिक्षकाच्या लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ या कुटुंबांना लागणाऱ्या साहित्याची यादी बनवली आणि सर्वच म्हणजे सतरा कुटुंबांना लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांच्याकडे सुपूर्द तर केल्याच, शिवाय यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले
या कार्यात अविनाश घोलप यांना शाश्वत संस्थेचे बुधाजीराव दामसे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. समीर राजे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मंगेश रत्नाकर आणि कालाध्यापक संघाचे अध्यक्ष भानुदास बोऱ्हाडे यांनी सहकार्य केले.
येथे व्हिडीओ पहा.