कोरोना या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि या लॉकडाऊन मध्ये आंबेगाव तालुक्यात कामानिमित्ताने आलेले पर राज्यातील मजूर आणि इतर लोकांना आपल्या घरी पाठविण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी व शासकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे. आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने किंवा अन्य काही कारणास्तव आलेले परप्रांतीय लोकांना एसटीने आपल्या घरी पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणा-या लोकांना एसटी महामंडळाच्या बसने मंचर व घोडेगाव येथुन रवाना केले. आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंता गवारी, लतादेवी वाजे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, वैदयकिय अधिक्षक डॉ. प्रताप चिंचोलीकर, डॉ. चंदाराणी पाटील, मंडलाधिकारी योगेश पाडळे, सुनिल नंदकर, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करडुले, माने आदि अन्य कर्मचारी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या जवळपास ५५९ लोकांना एकत्र करून त्यांच्या गावी बसने पाठवून दिले. सोश...
समर्थ भारत माध्यम समूह