कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे.त्यामुळे सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत.यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न अॅट होम’ म्हणजेच घरी बसूनच अध्ययन करणे या उपक्रमाकरिता द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्टने पुढाकार घेतला असून ट्रस्टच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील इयता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता घरबसल्या एक महिन्याकरिता मोफत इंग्रजी विषयाचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती तालुका समनव्यक स्मिता नायकवाडी यांनी दिली
संस्थेने शालेय अभ्यासक्रमावर आधारित एक महिन्याकरिता ऑनलाईन शैक्षणिक साहित्य तयार केले असून या अभ्यासक्रमाची दैनंदिन नवीन लिंक शिक्षकांना पाठवली जाते.आलेली लिंक शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालकांच्या मोबाईल पाठवतात आणि त्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या घरी बसून या लिंकद्वारे अभ्यास करतात.सदर ‘लर्न अॅट होम’ या ई-टिच कार्यक्रमाची सुरुवात एक एप्रिलपासून झाली असून तो तीस एप्रिलपर्यत चालणार आहे.यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांसाठी रोज नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्हिडिओ बनवले जात आहे.सदर उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा सकारत्मक प्रतिसाद मिळत आहे.यामध्ये पालक पण आपल्या मुलांचे अभ्यासाचे विविध व्हिडिओ बनवून पाठवत असल्याने उपक्रमाची फलनिष्पती वाढली आहे.यामुळे मुलांचा भाषा विकास होण्यास मदत होत असून मुले घरी सुरक्षित वातावरणात हसत खेळत इंग्रजी शिकत आहे.या उपक्रमाला आंबेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन,ट्रस्टचे प्रकल्प संचालक अस्ताद पारख,उत्पला ठक्कर,पिरोजा श्रॉफ,सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्टच्या माध्यमातून बनवलेल्या अभ्यासक्रमाचा ‘लर्न अॅट होम’ करताना जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा एकलहरेचा विद्यार्थी अथर्व पंदारे.