Skip to main content

रोशनी रोषणाई मे ना डूबे...

मॅक्स महाराष्ट्र या न्यूज पोर्टल चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी लिहिलेला लेख 'रोशनी रोषणाई मे ना डुबे'




इसलिए राह संघर्ष की हम चुनें
जिंदगी आंसुओं में नहायी न हो

     शाम सहमी न हो, रात हो न डरी
     भोर की आँख फिर डबडबाई न हो

सूर्य पर बादलों का न पहरा रहे
रौशनी रोशनाई में डूबी न हो.


अनेक चळवळींना प्रेरणा देणारं हे एक जुनं संघर्षगीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी दिवे लावायला सांगीतलय. अनेक लोकांचं जीवन लॉकडाऊन मुळे प्रभावित झालंय. त्या सर्वांच्या समर्थनार्थ महाशक्तीचा जागर करायचाय. दिवे लावायचे आहेत. प्रकाशाचा उत्सव करायचा आहे. विचार चांगला आहे, आणि घातक ही.


दिवे लावण्यात गैर काही नाही. मी रोज घरात दिवे लावतो. दिवे डिफ्युजरचं काम करतात. देशासाठी ही दिवे लावायला काही हरकत नाही. त्यासाठी मला पॉवरग्रीड ची ही चिंता नाही. भल्या मोठ्या पगारावर इंजिनिअर काम करतात तिथे, त्यांचं कामच आहे, ग्रीड ची स्टेबिलीटी मेन्टेन करणं. खरं तर ग्रीड वर काही परिणाम होऊ शकतो अशी पोस्ट भाजपचे प्रवक्ते आणि विद्युत कंपन्यावर काम केलेले माजी संचालक विश्वास पाठक यांनीच सगळ्यात आधी केली होती. ग्रीड यांची आव्हान आहे अशी त्यांची सकारात्मक पोस्ट होती.


असो, तर दिवे लावण्यात काही चुकीचं नाहीय. ज्या कारणासाठी लावायचे आहेत, त्यावर थोडी चर्चा होणं आवश्यक आहे. मराठीत एक म्हण आहे रोगापेक्षा इलाज भयंकर! कोरोना घातक आहेच, पण त्यावरचा इलाज जास्त भयंकर ठरला आहे. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, दुसरा काही उपाय नाही हे सरकारच्या लक्षात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर जानेवारी मध्येच लक्षात आलं होतं. फेब्रुवारी मध्ये गुजरात सरकारने आपली तयारी ही पूर्ण केल्याच्या बातम्या व्हायरल आहेत.


लिटमस टेस्ट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाचा जनता कर्फ्यु पण लावला. रात्री आठ वाजताच्या जनता के नाम संदेश मुळे लोकांमध्ये गोंधळ होतोय हे पण त्यांच्या लक्षात आलं होतं. तरी सुद्धा चुकांपासून ते काही शिकले नाहीत. सुखवस्तू लोकांच्या गराड्यात राहण्याची सवय झालेल्या त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला भान राहिलं नाही की या देशात बहुसंख्य मजूर-कामगार-शेतकरी दैनंदिन रोजी वर काम करतात. ते स्थलांतरीत आहेत. त्यांच्याकडे निवारा नाही, अन्नाची साठवणूक नाही. त्यांच्या बँकेत २१ दिवसाची रसद पुरवेल इतके पैसे नाहीत. लहानपणी आपण स्टॅचू गेम खेळायचो, पण त्यातही टाइम प्लीज ची सोय होती. मोदींच्या फतव्यात टाइम प्लीज ची सोय नव्हती. एकतर लॉकडाऊन करण्यात केलेला अक्षम्य वेळकाढूपणा आणि नंतर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन अचानक खटका मारून लॉकडाऊन घोषित करणं यात मोदींचा मानवीय चेहरा कुठेच दिसला नाही.


सार्वजनिक वितरण प्रणाली वर आलेला लोड, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचं नियोजन, आरोग्य सेवा आणि सेवकांच्या सुविधा यांची तरतूद यावर ते बोलतच नाहीत. ते इवेन्ट देतात. माझा इवेन्ट ला ही विरोध नाही. उलट या काळात मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चांगले इवेन्ट दिले पाहीजेत. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी काही कार्यक्रमही दिले पाहीजेत. पंतप्रधानांकडे या दृष्टीकोनाचा अभाव आहे. ते या काळात समाजातील उच्चभ्रू लोकांशी व्हिडीयो कॉन्फरन्स वर बोलत बसले. असं आंबेकर म्हणाले.


दुसरीकडे देशातील हातावर पोट असलेला मजूर-कामगार-शेतकरी वर्ग डोक्यावर सामान घेऊन स्थलातरासाठी रस्त्यावर उतरला. त्याला कोरोना, लॉकडाऊन, त्यानंतर येऊ घातलेली भीषण मंदी याचं काहीच ज्ञान नाहीय. या गोष्टी तसं तर पंतप्रधानांना ही कळत नव्हत्या हा भाग वेगळा. तर या कष्टकरी लोकांना दिलासा देणारं काहीच पंतप्रधान बोलत नाहीत. त्यांची नोकरी-रोजगार राहील की जाईल? त्यांचा मालक त्यांना पुन्हा कामावर घेईल का? मालकाचा कामधंदा शिल्लक राहिल का? आपली उपासमारी होणार नाही ना अशा अनेक प्रश्नांचं गोठोडं डोक्यावर घेऊन बाहेर पडलेल्या भारताला नरेंद्र मोदी यांनी #9PM9Minutes चा इवेन्ट चिटकवलाय.


६ एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिवस , त्या निमित्ताने ही रोषणाई चा सोहळा घेण्यात आल्याची ही चर्चा आहे. सगळीकडेच मोदी पक्ष हीत पाहतात असा त्यांच्यावर आरोप आहे, या आरोपांना बळकटी देण्याचं काम ते वारंवार करतात.
असो, तर मुलभूत प्रश्न बाजूला ठेवून आज रात्री ९ वाजता दिवे लावले जातील. हे दिवे लावताना ‘आपण सत्याचा कुठला प्रकाश झाकोळण्यासाठी हा झगमगाट करतोय? हा साधा प्रश्न मनात डोकावला तरी माणूस म्हणून आपलं जीवन सार्थकी लागलं असं समजायचं.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...