प्रधानमंत्री मोदी यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, की त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते पण, तसे झाले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि माध्यमांतील मंडळी जिवावर उदार होऊन जे काम करीत आहेत त्यांची आदर व्यक्त करतानाच आपला भक्कम पाठिंबा दिला.
मात्र मरकजप्रकरणावर राज यांनी सकडून टीका केली. ते म्हणाले, की अशा लोकांना तर गोळ्या घातल्या पाहिजे. जर तुम्ही ऐकत नसाल आणि उद्या जर एखाद्या सरकारने कठोर भूमिका घेतली तर पुन्हा ओरडू नका असा दमही त्यांनी दिला
लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नसेल तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. इतकी शांतता आपण 92-93च्या दंगलीतही पाहिली नव्हती असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते असं म्हटलं आहे.