महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, इंदापूर चा शेकडो मजुर कुटुंबांना आधार. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सी.वाय.डी.ए तसेच शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील(दगडेवस्ती)रामकुंड येथे जिल्हा बंदीमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश येथील शेकडो ऊसतोड मजुरांना, तसेच सराफवाडी गावातील मजूर, गरीब कुटुंबाना मोफत अन्नधान्याचे वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे किट(ता. ७ एप्रिल) मंगळवार रोजी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पोलीस वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शंकर मुटेकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय वैघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,उपाध्यक्ष संदिप सुतार,कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,मुख्य सचिव सागर शिंदे
व तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ ढोले, इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, भीमराव आरडे, भारत शेंडगे, संतोष ननवरे, निखील कणसे, सचिन खुरंगे, रामदास पवार, प्रवीण नगरे, गोकुळ टांंकसाळे, अर्जुन भोंग,अमोल रजपुत, लक्ष्मण भिसे, नितीन चितळकर, नानासाहेब मारकड,बाबासाहेब उगलमुगले, गणेश कांबळे, दत्तात्रय गवळी, विजयराव शिंदे, उदयसिंह जाधव देशमुख,इम्तिहाज मुलाणी, शिवाजी पवार, शिवकुमार गुणवरे, प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले, अक्षय आरडे, स्वप्नील चव्हाण यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.