Skip to main content

आज देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर...



 












एखाद्या संकटाच्या वेळी अमुक नेता असता तर त्याने कशी स्थिती हाताळली असती, अशी चर्चा जनमानसांत असते. आज फडणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्याचे अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळते. 













कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. आज प्रत्येक देश या संकटाशी मुकाबला करण्यासाठी परखड पावले उचलू लागला आहे. यामध्ये भारत देशही मागे नाही. पंतप्रधानांनी नुकतीच लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेला प्रतिसाद देत देशातील सर्व राज्यांतील व्यवहार बंद ठेऊन संसर्ग टाळण्यावर भर दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. पण आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी नेमके काय केले असते, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात घोळत आहे.


देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तरुण मुख्यमंत्री होते. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये ते केवळ दुसरे नेते होते. हे पदच असे असते की त्याने माणूस पाॅवरफुल असतो. प्रत्येक नेत्याला त्याच्या कारकिर्दीत संकटांशी सामना करावा लागतो. त्यावरून त्या नेत्याची परीक्षा होत असते. आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर किंवा फडणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते, असा प्रश्न जनमाणसांत चर्चेत असतो. त्याचे उत्तर या निमित्ताने अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळते. 
















भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी हे त्यांचे सूत्र पक्षात आणि सामाजिक कामातही पहायला मिळाले होते. तेच सूत्र त्यांनी कोरोना साथीशी दोन हात करताना वापरले असते. आजच्या परिस्थितीशी मुकाबाला करताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय अगदी सहज घेतले असते. पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने सरकार जनतेच्या आरोग्यासाठी झटत आहे. पण तरीही फडणवीस यांनी वेळेच्या आधीच काही पावले उचलली असती, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले. 


तसेच केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी केंद्राकडूनही महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी व इतर मदत उपलब्ध करून घेतली असती. सर्वात महत्वाचे म्हणजे ते स्वतः शहरीसह ग्रामीण भागापर्यंत जाऊन जनतेत जागृती करण्यासोबतच जनतेला धीर देण्याचे काम केले असते. थोडे कटू पण चांगले निर्णय घेतले गेल्याने महाराष्ट्रातील जनतेलाही या आणिबाणीच्या काळात थोडा अधिक दिलासा मिळाला असता.


तसेच आपल्या सोबत असलेल्या पक्षातील प्रत्येकाला ते काम करण्याची संधी देत होते. त्यानुसार कोरोनाशी दोन हात करताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष ते बुथ प्रमुखांपर्यंत सर्वांना यामध्ये सहभागी करून घेतले असते. तसेच प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या पाठीवर हात ठेऊन त्यांना अधिक ताकतीने लोकांपर्यंत जाऊन प्रशासनही तुमच्यासोबत आहे, याची जाणीव करून द्यायला लावले असते. भारतीय जनता पक्षाचे विविध विभाग तसेच सामाजिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत सुसंवाद साधून कोरोना साथीच्या कठीण प्रसंगी त्यांनी सर्वसामा्न्य जनतेला मदतीचा हात देण्यासोबतच त्यांना धीर देण्याचे काम केले असते. तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी हे त्यांचे सूत्र पक्षात आणि सामाजिक कामातही पहायला मिळेत. तेच सूत्र त्यांनी कोरोना साथीशी दोन हात करताना वापरले असते.


गृहमंत्रीपदही त्यांच्याकडेच होते. त्यामुळे पोलिसांनाही त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कोणालाही त्रास होणार नाही. याची दखल घेण्यास मात्र, निश्चित लावले असते. ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना पोलिसांकडून राज्यभरातील जनतेला कधीही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आजच्या परिस्थिती जमाव व संचारबंदीत त्यांनी पोलिस प्रशासनाकडून अत्यंत कुशलतेने काम करून घेतले असते. त्यासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही सहकार्य मिळाले असते.  केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने दोन्ही बाजूनी मदतीचा ओघ महाराष्ट्राला मिळाला असता. त्यातून या बंदच्या काळात सर्वसामान्य व गोरगरिब नागरीकांचे झालेले नुकसानीची ही भरपाई त्यांनी केली असती.


त्यांच्यातील महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते दिलेला शब्द पाळतात. त्यांनी आपत्कालिन परिस्थितीत सर्वसामान्य जनता, उद्योजक, शेतकरी आणि कामगार यांना दिलेला शब्द त्यांनी तातडीने पाळून त्यांना आर्थिक मदतीचा हातभारही लावला असता. आज ते मुख्यमंत्री नाहीत पण प्रभावी विरोधीपक्ष नेता म्हणून ते आजही कर्तव्य बजावत आहेत. सध्याच्या परिस्थितीत जनतेसह सध्या महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सरकारलाही ते साथ देण्याचे काम करत आहे. आजच्या घडीला सर्वांनीच एकमेकाला साथ देत कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे.


त्यामुळे त्यांनी विरोधकाची भुमिका थोडी बाजूला ठेऊन त्यांनी महाविकास आघाडीला काम करण्याची व कोरोना विरोधात सक्षमतेने लढा देण्याची मोकळीक दिली आहे. त्यामुळे सध्याचे सरकारही कोणतीही शंका मनात न ठेवता पोलिस, आरोग्य विभाग आणि महसूल प्रशासनाच्या मदतीने जनतेच्या आरोग्यासाठी झटताना दिसत आहेत. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपध्दतीची आज भाजपच्या कार्यकर्त्यांसह व महाराष्ट्रातील जनतेला आठवण होत आहे.


विरोधी पक्षनेता म्हणून तितकेच प्रभावी- मदन भोसले, (माजी आमदार)


मदन भोसले म्हणाले, जागतिक पातळीवर देशात, महाराष्ट्रात कोविड १९ मुळे परिस्थिती गंभीर आहे. अन्य देशांना ती हाताळण्यास उशीर झाला त्याचे परिणाम पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांनी एकूणच अन्य देशांचे पूर्वानुभव लक्षात घेता जे तत्परतेने करणे गरजेचे आहे ते निश्चितच केले आहे. त्याला अनुसरून राज्य पातळीवरील विद्यमान सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सर्व सदस्य विशेष करून आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही तेवढ्याच गांभीर्याने हा प्रश्न हाताळताना दिसत आहेत. तसेच देवेन्द्रजी यांच्याकडे दूरदर्शीपणा आणि अचुकपणा, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. मात्र आता ते मुख्यमंत्री नसल्याने मुख्यमंत्रीपदाचे अधिकार राबवता येत नसले तरी प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून ते आजही कर्तव्य बजावताना दिसत आहेत. आता खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे ती आपल्यातील प्रत्येकाची. या संकटाला परतावून लावण्याचं आपल्याकडे उपलब्ध असलेलं लॉकआउट, गर्दी न करणे आणि कोरोनाची साखळी तोडणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...