मोदींचा खेळ होईल व सर्व भारतीय लोकांना त्रास होईल.
आपला इव्हेंट चा सोस देशातली आरोग्य व्यवस्था मोडून काढू शकतो.
जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर विजेची मागणी एकदम कमी होऊन जाईल. आधीच लॉक डाऊन मुळे मागणी कमी झाल्यामुळे मागणी पुरवठा आणि निर्मिती चे गणित बिघडले आहे.
जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर (जर वापर असेल तरच वीज निर्माण करता येते, वापरच नसेल तर बनवलेली वीज कुठे ठेवता येत नाही ) अजून परिस्थिती बिघडून जाईल व स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाई फ्रिक्वेन्सी वर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
या इव्हेंट चा फेरविचार व्हावा असे मत अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्राची विजेची मागणी २३००० MW वरून १३००० घटलेली आहे आणि ही १३००० MW वीज फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरघुती विजेचा लोड आहे.
जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सी वर ट्रिप होतील.संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्र सारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअर मूळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टि स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील, आयसीयूमध्ये माणस मरतील कारण सगळीकडे बॅकअप असेलच असे नाही. जनरेटर चालवले तरी त्याला मर्यादा आहेत, डिझेल पुरवठा व्हायला हवा कारण हा डाऊन टाइम प्रचंड मोठा आहे.
डाऊन टाईम नेमका किती याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नेमकी परिस्थिती स्पष्ट केली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
एक पॉवर स्टेशन सर्विस मध्ये यायला साधारण १६ तास लागतात या प्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला एक आठवडा जाईल.
आपला इव्हेंट चा सोस आपल्याच दवाखान्यात असलेल्या माणसांच्या जीवावर उठू शकतो.