कोरोना मुळे होणाऱ्या कोव्हिड १९ या आजारावर मलेरियावर लागू पडणाऱ्या 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' या औषधावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्यातबंदी घातली होती. त्याचबरोबर इतरही काही औषधांवर भारताने निर्यातबंदी घातली होती. देशात कोव्हिड १९ च्या उपचारासाठी या औषधांची कमतरता पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे या औषधांची मागणी केली होती. भारताकडून यावर काहीही प्रतिक्रिया येत नसल्याचे पाहून ट्रम्प यांनी निर्वाणीचा शब्दांत इशारा वजा धमकी दिली होती. 'भारताने ही औषधे अमेरिकेला द्यावीत, जर दिली नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील आणि का भोगावे लागू नयेत?' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच मोदींनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधावरील तसेच इतर काही औषधांवरील निर्यातबंदी उठवली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर प्रधानमंत्री मोदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील नागरिक चांगलेच संतापले असून, मोदींनी असा निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होईल असं कृत्य केलं असल्याची चर्चा आहे.
पहा काय बोलले डोनाल्ड ट्रम्प..!