जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बलाढ्य अमेरिकेने आता या आजाराशी लढण्यासाठी भारतापुढे मदतीसाठी हात पसरला आहे. COVID-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतानं अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांचा पुरवठा करावा अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले.
“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांची स्थगित केलेली अमेरिकेची ऑर्डर लवकरच पूर्ण करण्याचा भारत गांभिर्याने विचार करत आहे” अशी माहिती डोनाल्ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर दिली. डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन आपणही हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळी घेऊ असंही ट्रम्प म्हणाले आहेत. हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन ही गोळी मलेरियाच्या उपचारासाठी दिली जाते.
परंतू भारतात कोरोनाच्या रुग्णांसाठी ही गोळी फायद्याची ठरत असल्याने आता अमेरिकेने या गोळ्या मागवल्या आहेत. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने भारतानं मलेरिया रोधक औषधांची निर्याती थांबवली असल्याने अमेरिकेने या गोळ्यांचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
फोनवरील चर्चेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिका कोरोनाविरोधातल्या लढाईत एकमेकांना पूर्ण सहकार्य करतील असं म्हणत अमेरिकेची मदत करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान अमेरिकेत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा दररोज वाढतोय. गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधीत २३ हजार ९४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासात १ हजार २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधीतांची संख्या ३ लाखांच्यावर गेली असून मृतांचा आकडा ८ हजार १७५ झाला आहे. हे सर्व पाहून प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल.