देशभरात कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याने; ग्रामीण पुण्यातही योग्य ती दक्षता घेतली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिस ठाणे हद्दीतील आळे, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे,आणे या संवेदनशील गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आले. दरम्यान सरकारी वाहनावरील पी. ए. सिस्टिमवरून नागरिकांना विणारकारण रस्त्यावर न फिरण्याच्या सूचना दिल्या. कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर येऊ नये अशा सूचना दिल्या.
आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या रूट मार्च मध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक आदर्श, समाजशील आणि जागरूक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाहनाला आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चांगला प्रतिसाद मिळत आहे.