Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मच्छीमारांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

  इंदापूर(प्रतिनिधी):- संचारबंदी व लॉक डाऊनलोड असल्याने उजनी जलाशय परिसरातील मच्छिमारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.या मच्छीमारांचा सर्वे करून,इंदापूर तालुका महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाने जीवनोपयोगी वस्तूंचे व धान्याचे वाटप केल्याने,खऱ्या अर्थाने मच्छीमारांना आधार मिळाला असे गौरवोद्गार भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी काढले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने गरीब,गरजू व मच्छीमार कुटुंबियांना मोफत अन्नधान्याचे व वस्तूंचे किट वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत (नाना)बंडगर व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने साहेब,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथे सोमवार(ता.२७ एप्रिल)रोजी संपन्न झाला.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने मच्छीमारांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे उपाध्यक्ष जिल्हा प्रसिद्धीप्र...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर चे वितरण.

जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.  घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले असून गर्दी होणार नाही यासाठी पोलिस विषेश खबरदारी घेत आहेत. अशात २४ तास दक्ष असणाऱ्या पोलीस बांधवांना कोरोनाची लागण होण्याचा मोठा धोका आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने, संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, राज्याध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटनिस विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मदतकार्य सुरू आहे. याच धर्तीवर कोव्हिड १९ या महाभयंकर आजारापासून काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार तसेच पोलिस उपनिरिक्षक अपर्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटाझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. समीर पठाण,...

कोरोना विरुद्धच्या लढाईत सरपंच मैदानात.

मंचर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार तसेच बँका, पतसंस्था यांचे  कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतले आहे . ग्रामपंचायतच्या वतीने सर्व व्यक्तीचे तापमान आठवड्यातुन दोन वेळा  घेण्याचे काम सरपंच दत्ता गांजाळे यांनी चालू केले आहे. चाकण येथे अंडी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी म्हणून मंचर येथे अत्यावश्यक सेवा देणारे मेडिकल, किराणा,भाजीपाला,शिवभोजन,होम डिलीव्हरी करणारे तसेच बॅंका,पतसंस्था यांचे बाहेर गावावरून येणारे कर्मचारी याचे तापमान घेण्यात येत आहे. आज स्वतः सरपंच दत्ता  गांजाळे यांनी अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानात जाऊन तसेच बँका, पतसंस्थामध्ये जाऊन तापमान तपासले . प्रत्येक व्यक्तीच्या  तापमानाची नोंद  ठेवण्यात आली आहे. दर आठवड्याला 2 वेळा तापमान घेऊन जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या तापमानात बद्दल आढळल्यास त्याचे मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेण्यात येईल. असे सरपंच गांजाळे यांनी सांगितले. मंचर येथे असणाऱ्या विविध बॅंका ,पतसंस्था या ठिकाणी असणारे कर्मचारी हे बाहेर गावावरून कामासाठी मंचर येथे येत अस...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीचे घरीच आयोजन

ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान,कळंब(ता.आंबेगाव) च्या वतीने कोरोना आपत्तीमुळे महात्मा फुले व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साधेपणाने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा फुले-आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सार्वजनिक मिरवणुका, शोभायात्रा काढू नयेत, वाद्ये वाजवू नयेत, त्याऐवजी घरामध्येच या थोर महात्म्यांच्या  प्रतिमेला अभिवादन करावे, असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले होते.त्याचे पालन करत ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनीषा कानडे ,समीक्षा कानडे ,सम्राट कानडे ,शांता कानडे यांनी प्रतिमापूजन केले .एक दिवा ज्ञानाचा ...तर एक दिवा संविधानाचा लावत या महापुरुषांचे जीवनाधारीत गाण्यांचे श्रवण केले.निवडक पुस्तकांचे वाचन केले.कु.सान्वी कानडे ,लावण्या कानडे ,ईश्वरी कानडे यांनी ..आला भीमराया,जग उद्धाराया ..हे गीत गाऊन जयजयकार करत महामानवाला अभिवादन केले.  यावेळी  बाळासाहेब कानडे म्हणाले, "थोर समाज सुधारक महात्मा फुले  व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला.समाजातील दुर्बल, वंचित, उप...

साने गुरुजी कथामालेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अकरा हजारांची मदत.

देशात व राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवत आहे.मात्र या उपाययोजना राबवताना आर्थिक मदतीची गरज असल्याने त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने मदतीचे आवाहन समाजातील घटकांना केले आहे.या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणच्या वतीने कोरोना निवारण व प्रतिबंधात्मक उपाय  योजनांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.     साने गुरुजी कथामालेद्वारा मुख्यमंत्री सहाय्यता मदतनिधीसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयेचा धनादेश  प्रांताधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे कथामाला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,सचिव चांगदेव पडवळ,कार्यकारी सदस्य संतोष थोरात यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने कथामाला कार्यकारिणीची राष्ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कारप्राप्त शाळा शिवनगर(ता.शिरूर) येथे होणारी नियोजित मासिक सभा कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर रद्द करून वॉट्स-अप चर्चा घेण्यात आली .प्रमूख कार्यवाह शामराव...

द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्टच्या पुढाकाराने लर्न ऍट होम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे.त्यामुळे सध्या सर्वत्र शाळा बंद आहेत.यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न अॅट होम’ म्हणजेच घरी बसूनच अध्ययन करणे या उपक्रमाकरिता द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्टने पुढाकार घेतला असून ट्रस्टच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील इयता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता घरबसल्या एक महिन्याकरिता मोफत इंग्रजी विषयाचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती तालुका समनव्यक स्मिता नायकवाडी यांनी दिली     संस्थेने शालेय अभ्यासक्रमावर आधारित एक महिन्याकरिता ऑनलाईन शैक्षणिक साहित्य तयार केले असून या अभ्यासक्रमाची दैनंदिन नवीन लिंक शिक्षकांना पाठवली जाते.आलेली लिंक शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालकांच्या मोबाईल पाठवतात आणि त्यानंतर विद्यार्थी स्वतःच्या घरी बसून या लिंकद्वारे अभ्यास करतात.सदर ‘लर्न अॅट होम’  या ई-टिच कार्यक्रमाची सुरुवात एक एप्रिलपासून झाली असून तो तीस एप्रिलपर्यत चालणार आहे.यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थांसाठी रोज नाविन्यपूर्ण शैक्षणिक व्हिडिओ बनवले जात आहे.सदर...

आळेफाटा पोलीस स्टेशनचा यशस्वी रूट मार्च.

देशभरात कोरोनाने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याने; ग्रामीण पुण्यातही योग्य ती दक्षता घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलिस ठाणे हद्दीतील आळे, पिंपळवंडी, राजुरी, बेल्हे,आणे या संवेदनशील गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आले. दरम्यान सरकारी वाहनावरील पी. ए. सिस्टिमवरून नागरिकांना विणारकारण रस्त्यावर न फिरण्याच्या सूचना दिल्या. कुठल्याही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर येऊ नये अशा सूचना दिल्या. आळेफाटा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या रूट मार्च मध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे पुणे ग्रामीण पोलीस दलातील एक आदर्श, समाजशील आणि जागरूक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आवाहनाला आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, इंदापूर चा शेकडो मजुर कुटुंबांना आधार. अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व सी.वाय.डी.ए तसेच शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील(दगडेवस्ती)रामकुंड येथे जिल्हा बंदीमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश येथील शेकडो ऊसतोड मजुरांना, तसेच सराफवाडी गावातील मजूर, गरीब कुटुंबाना मोफत अन्नधान्याचे वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे किट(ता. ७ एप्रिल) मंगळवार रोजी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व पोलीस वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक शंकर मुटेकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता धनंजय वैघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,उपाध्यक्ष संदिप सुतार,कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,मुख्य सचिव सागर शिंदे व तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर गलांडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सोमनाथ ढोले, इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, भीमराव आरडे, भारत शेंडगे, संतोष ननवरे, निखील कणसे, सचिन खुरंगे, रामदास पवार, प्रवीण नगरे, गोकुळ टांंकसाळे, अर्...

ट्रम्प यांच्या धमकीनंतर प्रधानमंत्री मोदी बॅकफूटवर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन वरिल निर्यात बंदी उठवली

कोरोना मुळे होणाऱ्या कोव्हिड १९ या आजारावर मलेरियावर लागू पडणाऱ्या 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीन' या औषधावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्यातबंदी घातली होती. त्याचबरोबर इतरही काही औषधांवर भारताने निर्यातबंदी घातली होती. देशात कोव्हिड १९ च्या उपचारासाठी या औषधांची कमतरता पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे या औषधांची मागणी केली होती. भारताकडून यावर काहीही प्रतिक्रिया येत नसल्याचे पाहून ट्रम्प यांनी निर्वाणीचा शब्दांत इशारा वजा धमकी दिली होती. 'भारताने ही औषधे अमेरिकेला द्यावीत, जर दिली नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील आणि का भोगावे लागू नयेत?' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच मोदींनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधावरील तसेच इतर काही औषधांवरील निर्यातबंदी उठवली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर प्रधानमंत्री मोदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील नागरिक चांगलेच संतापले असून, मोदींनी असा निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर भारता...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर येथे निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण.

मंचर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. अमरनाथ सेवा संघ तसेच ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आज सकाळी या निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कक्ष ठेवण्यात आला असून पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांच्यासाठी हा कक्ष कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करावा असे आव्हान सरपंच दत्ता गांजळे यांनी केले आहे.  दरम्यान शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कक्षाची पाहणी करून काही आवश्यक सूचना दिल्या. अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, अवधूत शेटे, रामराजे निघोट, शेखर चौधरी, सरपंच दत्ता गांजाळे, भैरवनाथ संस्थेचे संचालक सागर काजळे, ग्रामपंचायत सदस्य  लक्ष्मण थोरात, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, गावकामगार तलाठी हेमंत भागवत आदी यावेळी उपस्थित होते.  या निर्जंतुकीकरण कक्षाचा उपयोग कोरोनाचा फैलाव रो...

त्या निष्ठुर हवालदाराला निलंबित करा - सचिन बांगर

अवसरी येथील रहिवाशी असणाऱ्या ससाणे भावंडांना अमानुष मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित करण्यात यावे अशी मागणी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे विस्तारक सचिन बांगर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी शेतावर काम करत असणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ओंकार ससाणे आणि रोहन ससाणे या भावंडांना गावडेवाडीच्या हद्दीत मंचर पोलीस ठाण्याचे अवसरी बीट चे हवालदार सुनील शिंदे यांनी अमानुष मारहाण केली होती. यात ओंकार ससानेच्या डोक्यात काठी लागून त्याची शुद्ध देखील हरपली होती. या मारहाणीचा व्हिडीओ राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती, त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ संबंधित हवालदाराची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुणे येथील मुख्यालयात बदली केली होती.  ससाणे भावंडाना झालेल्या या मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय असून यात ओंकार च्या डोक्यावर झालेला आघात अजून थोडा जरी तीव्र असता तर त्याच्या जीवाला काही बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण...

विघ्नहर च्या कर्मचाऱ्यांनी केली सव्वा सात लाखांची मदत.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि कर्मचारी प्रतिनिधी यांनी जुन्नर चे आमदार अतुल बेनके आणि उपविभागीय अधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे सव्वा सात लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याची घटना घडली आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा कारखाना दातृत्वातही अग्रेसर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि शेतकऱ्यांना मोफत सॅनिटायझर्स देणार असल्याचेही कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता भारतासह महाराष्ट्रातही डोके वर काढायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनही कसोशीने प्रयत्न करत आहे. राज्य शासनाल...

महाराष्ट्रात कोरोनाचे ४३ बळी, राज्यात कोरोनाचा धोका वाढला.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे तर आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर राज्यात आत्तापर्यंत ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी आणि मृत व्यक्तीची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या २४ तासात राज्यात १३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्यापैकी ८ जण मुंबईतील, ३ जण पुण्याचे तर प्रत्येकी १ रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहें. 1) कस्तुरबा रुग्णालयात डोंबिवली येथील एका ६७ वर्षीय महिलेचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. तिने परदेश प्रवास केलेला नव्हता. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजारही होते. 2) कस्तुरबा रुग्णालयात एका ६४ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. 3) नायर रुग्णालयात एका ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. 4) के ई एम रुग्णालय मुंबई येथे एका ६० वर्षीय पुरुषाचा आज पहाटे मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. 5) क...

त्या नऊ मिनिटांत नक्की काय झाले..?

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाईट बंद करुन दिवे लावण्याच्या आवाहनला रविवारी रात्री मोठा प्रतिसाद मिळाला. पण ९ मिनिटे लाईट बंद करुन ठेवण्यामुळे राज्यात वीज ग्रीडवर परिणाम होऊन वीजेचा पुरवठा खंडीत होण्याची भीती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. परंतू वीज ग्रीडवर या लाईट बंद करण्याच्या प्रक्रियेचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. त्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्या, ऊर्जा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच जनतेनेही घरातील मेन स्वीच बंद न करता केवळ विजेचे दिवे बंद करुन मेणबत्त्या व इतर दिवे लावल्याने ऊर्जामंत्र्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. दिवे बंद करण्याच्या उपक्रमाच्या काही मिनिटे आधापीसून ऊर्जामंत्री नागपूरच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ९ मिनिटांच्या कालावधीत राज्यभरात विनाव्यत्यय वीज पुरवठा सुरू होता. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. त्या ९ मिनिटांत कसा झाला विजेचा वापर? वेळ विजेची मागणी (मेगावॅट) रात्री ८. ३९ १३ हजार ३७७ रात्री ८. ४२ ...

मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांची बदली. अखेर ससाणे भावंडांना मिळाला न्याय.

दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील वायाळ मळा येथील शेतावर काम करणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या दोन भावंडांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदार सुनील शिंदे यांची पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस च्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. सर्वप्रथम समर्थ भारत न्यूज ने घटनेची दखल घेत या पोलीस हवालदाराचे कारनामे जनतेसमोर आणले होते. या  बातमीची दखल घेत; अधीक्षक संदीप पाटील याांनी ही कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने निष्पाप, निरागस भावंडे, त्यांचे कुटुंबीय आणि जनतेने समाधान व्यक्त केले आहे.  कोरोना ला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून यादरम्यान पोटापाण्यासाठी घराबाहेर निघणाऱ्या जनतेशी सबुरीने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देऊनही काही पोलीस अधिकारी या सुचनेकडे दुर्लक्ष करत गरीब जनतेवर रुबाब करत आहेत. पोलीस हवालदार शिंदे यांनी देखील शेतावर राबणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवण घेऊन जाणाऱ्या गरीब, दुर्बल आणि निरागस भावंडांना अमानुषपणे मारहाण केली होती. या दोघांपैकी रोहन ससाणे हा तर अल्पवयी...

अमेरिकेला भारताकडून हवे आहे हे औषध, ट्रम्प यांनी मोदींकडे केली मागणी.

जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बलाढ्य अमेरिकेने आता या आजाराशी लढण्यासाठी भारतापुढे मदतीसाठी हात पसरला आहे. COVID-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतानं अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांचा पुरवठा करावा अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळ्यांची स्थगित केलेली अमेरिकेची ऑर्डर लवकरच पूर्ण करण्याचा भारत गांभिर्याने विचार करत आहे” अशी माहिती डोनाल्ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर दिली. डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन आपणही हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन गोळी घेऊ असंही ट्रम्प म्हणाले आहेत. हायड्रॉक्सीक्लोरिक्वीन ही गोळी मलेरियाच्या उपचारासाठी दिली जाते. परंतू भारतात कोरोनाच्या रुग्णांसाठी ही गोळी फायद्याची ठरत असल्याने आता अमेरिकेने या गोळ्या मागवल्या आहेत. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने भारतानं मलेरिया रोधक औषधांची निर्याती थांबवली असल्याने अमेरिकेने या गोळ्यांचा पुरवठ...

रोशनी रोषणाई मे ना डूबे...

मॅक्स महाराष्ट्र या न्यूज पोर्टल चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी लिहिलेला लेख 'रोशनी रोषणाई मे ना डुबे' इसलिए राह संघर्ष की हम चुनें जिंदगी आंसुओं में नहायी न हो      शाम सहमी न हो, रात हो न डरी      भोर की आँख फिर डबडबाई न हो सूर्य पर बादलों का न पहरा रहे रौशनी रोशनाई में डूबी न हो. अनेक चळवळींना प्रेरणा देणारं हे एक जुनं संघर्षगीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी दिवे लावायला सांगीतलय. अनेक लोकांचं जीवन लॉकडाऊन मुळे प्रभावित झालंय. त्या सर्वांच्या समर्थनार्थ महाशक्तीचा जागर करायचाय. दिवे लावायचे आहेत. प्रकाशाचा उत्सव करायचा आहे. विचार चांगला आहे, आणि घातक ही. दिवे लावण्यात गैर काही नाही. मी रोज घरात दिवे लावतो. दिवे डिफ्युजरचं काम करतात. देशासाठी ही दिवे लावायला काही हरकत नाही. त्यासाठी मला पॉवरग्रीड ची ही चिंता नाही. भल्या मोठ्या पगारावर इंजिनिअर काम करतात तिथे, त्यांचं कामच आहे, ग्रीड ची स्टेबिलीटी मेन्टेन करणं. खरं तर ग्रीड वर काही परिणाम होऊ शकतो अशी पोस्ट भाजपचे प्रवक्ते आणि विद्युत कंपन्यावर काम केलेले माजी संचालक विश्वा...

मोदींचा खेळ देशाला परवडणारा नाही.

  मोदींचा खेळ होईल व सर्व भारतीय लोकांना त्रास होईल.  आपला इव्हेंट चा सोस देशातली आरोग्य व्यवस्था मोडून काढू शकतो. जर सर्व देशात एकाच वेळी लाईट बंद केले तर विजेची मागणी एकदम कमी होऊन जाईल. आधीच लॉक डाऊन मुळे मागणी कमी झाल्यामुळे मागणी पुरवठा आणि निर्मिती चे गणित बिघडले आहे. जर सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केले तर (जर वापर असेल तरच वीज निर्माण करता येते, वापरच नसेल तर बनवलेली वीज कुठे ठेवता येत नाही ) अजून परिस्थिती बिघडून जाईल व स्टेट तसेच सेंट्रल ग्रीड हाई फ्रिक्वेन्सी वर फेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.   या इव्हेंट चा फेरविचार व्हावा असे मत अनेक तज्ञ व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्राची विजेची मागणी २३००० MW वरून १३००० घटलेली आहे आणि ही १३००० MW वीज फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरघुती विजेचा लोड आहे.  जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड  फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सी वर ट्रिप होतील.संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्र सारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअर मूळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टि स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि ...

आज देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री असते तर...

  एखाद्या संकटाच्या वेळी अमुक नेता असता तर त्याने कशी स्थिती हाताळली असती, अशी चर्चा जनमानसांत असते. आज फडणवीस मुख्यमंत्री असते तर काय झाले असते, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्याचे अनेकांशी चर्चा केल्यानंतर मिळते.  कोरोना विषाणूच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. आज प्रत्येक देश या संकटाशी मुकाबला करण्यासाठी परखड पावले उचलू लागला आहे. यामध्ये भारत देशही मागे नाही. पंतप्रधानांनी नुकतीच लॉकडाऊनची घोषणा केली. या घोषणेला प्रतिसाद देत देशातील सर्व राज्यांतील व्यवहार बंद ठेऊन संसर्ग टाळण्यावर भर दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. पण आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर त्यांनी नेमके काय केले असते, असा प्रश्न आज अनेकांच्या मनात घोळत आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तरुण मुख्यमंत्री होते. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहणाऱ्यांमध्ये ते केवळ दुसरे नेते होते. हे पदच असे असते की त्याने माणूस पाॅवरफुल असतो. प्रत्येक नेत्याला त्याच्या कारकिर्दीत संकटांशी सामना करावा लागतो. त्यावरून त्या नेत्याची परीक्षा होत असते. आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर कि...

मरकज च्या गुन्हेगारांना गोळ्या घाला - राज ठाकरे

    देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना निजामुद्दीन मधील मरकजमध्ये धार्मिक कार्यासाठी आलेल्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे तसेच जे नर्स तुमची सेवा करतात त्यांच्यासमोर अश्‍लील चाळे करणाऱ्या आणि लोकांच्या अंगावर थुंकणाऱ्यांना फोडून काढतानाचे व्हिडिओ व्हायरल करायला हवेत अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली.  प्रधानमंत्री मोदी यांच्यावरही टीका करताना ते म्हणाले, की त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते पण, तसे झाले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमी पत्रकार परिषदेत बोलताना कोरोनाच्या संकटात डॉक्‍टर्स, नर्स आणि माध्यमांतील मंडळी जिवावर उदार होऊन जे काम करीत आहेत त्यांची आदर व्यक्त करतानाच आपला भक्कम पाठिंबा दिला.  मात्र मरकजप्रकरणावर राज यांनी सकडून टीका केली. ते म्हणाले, की अशा लोकांना तर गोळ्या घातल्या पाहिजे. जर तुम्ही ऐकत नसाल आणि उद्या जर एखाद्या सरकारने कठोर भूमिका घेतली तर पुन्हा ओरडू नका असा दमही त्यांनी दिला  लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नसेल तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त केली आहे. इतकी शांतता आपण 92-93च्या द...

मंचर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदाराची मुजोरी! अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण!

मंचर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा उर्मठपणा, गरीब निरागस मुलांना अमानुष मारहाण आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या ठिकानी आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जात असणाऱ्या ओंकार ससाणे आणि त्याचा अल्पवयीन भाऊ रोहन ससाणे या दोघांना मंचर पोलीस स्टेशनचे अवसरी बिट चे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी काहीही विचारपूस न करता अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून; आंबेगाव तालुक्यातून या घटनेचा प्रचंड निषेध व्यक्त केला जात आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नागरिकांनीही घरातच राहणे पसंद केले असून काही अपवाद वगळता या लॉकडाऊनला चांगला प्रतिसादही मिळत आहे. सुरवातीच्या काळात पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना चोप दिल्याची उदाहरणे समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला खरा, मात्र पोलीसी अहंकार आणि माज डोक्यात गेलेल्या काही अधिकाऱ्यांची अक्कल अद्याप ठिकाणावर आल्याचे दिसत नाही. अशाच पोलिसी अहंकारातून मंचर पोलीस ठाण्याचे अवसरी बीटचे पोलीस हवालदार स...

मुस्लिमांनो आता चूक करु नका - रवींद्र आंबेकर

देशभर सध्या निजामुद्दीन येथील मरकज चा मुद्दा गाजतोय. कोरोना प्रसारासाठी धार्मीक कार्यक्रमांमुळे हातभार लागण्याची शक्यता वारंवार बोलून दाखवूनही हा धार्मीक कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली असं पुढे येत आहे. देशातील कोरोनाचं संकट आता हलकं वाटू लागेल. इतकी चर्चा या निमित्ताने मुस्लीम धर्मीयांवर होत आहे. राष्ट्रीय माध्यमं आणि काही विशिष्ट पक्षाच्या अनुयायांची वक्तव्ये किंवा सोशल मिडीयावरील पोस्ट या निव्वळ चिथावणीखोर आहेत. या चर्चा ताज्या असतानाच आता कर्नाटकातील आशा ( ASHA ) सेविकेवर ही हल्ला झाल्याची बातमी आलीय. वस्तीत सर्वे आणि तपासणीसाठी गेलेल्या आशा वर्कर वर हल्ला करण्यात आला, धक्काबुक्की करण्यात आली. हे सर्व गंभीर आहे. या सर्व प्रकारांमध्ये मुस्लीम धर्मीयांवर आता टीका केली जात आहे. हे देशासाठी योग्य नाही. देशभरात कोरोना मुळे लॉकडाऊन असताना; काही मशीदींमध्ये नमाज पढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे व्हिडीयो ही दरम्यानच्या काळात व्हायरल होते. आज तर ट्वीटर वर निजामुद्दीन मधले अतिरेकी #NizamuddinTerrorists #TabligiJamaat ASHA असे मुस्लीमांच्या विरोधातल...

अफवा पसरविणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

देशात एकीकडे कोरणाने डोके वर काढायला सुरुवात केली असतानाच संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी गाईच्या तुपाचा आणि गोमूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल,’गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासाने तूप नाकात फिरवले, गोमूत्र दिले तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,’अशी अफवा पसरविणा-या संभाजी भिडे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हिड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडनिय कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यासह देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराहून अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या उपायांचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे....