Skip to main content

महिलेशी फेसबुक वरील मैत्री आली अंगलट. सहकाऱ्यांच्या मदतीने एकास लुटण्याचा प्रयत्न

फेसबुक वर ओळख करून वारंवार गप्पा मारून व्यवसायानिमित्त बोलायचे आहे आपण बाहेर भेटू असे म्हणत नाशिक येथील व्यक्तीला भेटायला बोलावून त्याला साथीदारांच्या मदतीने जबर मारहाण करत त्याला लुटण्याचा प्रकार मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब येथे घडला आहे याबाबत त्या व्यक्तीने आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत.




याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मोहनराव सातपुते (वय ४३ व पंचवटी, नाशीक) या व्यक्तीची २० दिवसांपूर्वी पुजा पाटील नावाच्या महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती त्यांच्यात वारंवार गप्पा होत होत्या फिर्यादी नोकरी करत मोकळ्या वेळेत मार्केटिंगचे काम करत होता.दिनांक २८/२/२०२० रोजी दुपारी १२:३० वा चे सुमारास महिलेने फेसबुकवर मेसेज करुन आपण उदया व्यवसायाच्या कामासाठी भेटुया तुम्ही नाशीकपासुन अर्ध्या अंतरावर या मी पुणे पासुन अर्ध्या अंतरावर येते त्यानंतर दिनांक २९/२/२०२० रोजी सकाळी महिलेने फेसबुकवर मेसेज करुन आपऩ सकाळी ११ वा चे दरम्य़ान भेटु असे सांगितले त्यानंतर दुपारी फोन करुन सांगितले की मी पुणे वरुन निघाले आहे .त्यानंतर फिर्यादीने ५:३० वा चे दरम्यान तिला फोन करुन विचारले की कुठपर्यंत आलात असे विचारले असता महिलेने मी रस्त्यात आहे असे सांगितले त्यानंतर परत फिर्यादीने त्यांना सायंकाळी मेसेज करुन सांगितले की तुम्हाला वेळ लागत असेल तर तुम्ही जेथे असाल तेथुन परत जा त्यानंतर महिलेने फोन करुन मी नाराय़णगाव जवऴ रोडच्या कडेला गाडी उभी करुन थांबले आहे तुम्ही या असे सांगितले असता फिर्यादी रात्री ९ वा चे दरम्यान नारायणगावच्या पुढे २ किमी अंतर गेल्यावर त्याला एक स्वीफ्ट गाडी उभी असलेली दिसली.


त्याठिकाणी तो गाडीतून खाली उतरला असता स्वीफ्ट गाडीमधुन तीन इसम खाली उतरले व त्याला फिर्यादीच्या गाडीत अल्टो ८०० नंबर एम.एच.१५ इ.एक्स.१०३६ गाडीमध्ये बसविले व तु आमचे बहीणीबरोबर फेसबुकवर ओळख करुन तिला त्रास देतो असे म्हणुन मारहाण करत व खिशातील ४ हजार रुपये , सँमसंग व एम.आय.कंपनीचे दोन मोबाईल तसेच डेबीट व क्रेडीट कार्ड,आधारकार्ड इ काढुन घेतले त्यानंतर गाडी पुण्याच्या दिशेने नेऊन भोसरीच्या जवळ एका निर्जन ठिकाणी उभी करुन फिर्यादिस मारहाण करत आम्हाला पंधरा लाख रुपये दे नाहीतर आमचे बहीणीला त्रास देतो अशी तुझ्याविरुद्ध पोलीसात खोटी तक्रार देवु असे म्हणाले पूर्ण रात्रभर फिर्यादिस गाडीत फिरवुन वेऴोवेऴी हाताने ,राँडने मारहाण करुन चटके देवुन पैशाची मागणी केली दुसऱ्या दिवशी सकाळी ते फिर्यादीस मारहाण करत असताना तो त्यांना झटका देवुन पळुन गेला व जवळील बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीसांना घेववुन त्या ठिकाणी गेला असता तेे तीन इसम गाडी घेवुन तेथुन पळुन गेले होते.नंतर फिर्यादीने आळेफाटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून घडलेला गुन्हा मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो मंचर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करत आहेत.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...