जेष्ठ पत्रकार भरत अवचट यांना ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा
राज्य पत्रकार संघ जुन्नर व आंबेगावच्या वतीने सकाळचे जेष्ठ पत्रकार, राज्यशासनाच्या वतीने सन २०१७ ला पहिला शिवनेरी भूषण प्रतिभावंत पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आदरणीय भरत त्र्यंबक अवचट (काका) यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचा मान-सन्मान जुन्नर तालुका अध्यक्ष रविंद्र भोर व आंबेगाव तालुका प्रतिनिधी अविनाश घोलप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राजू डोके, शिवाजी अस्वार, मनोहर हिंगणे व प्रतिनिधी उपस्थित होते.
अवचट यांना राज्यशासनाच्या वतीने सन २०१७ चा पहिला शिवनेरी भूषण प्रतिभावंत पत्रकार पुरस्कार देण्यात आला. सन २०११ मध्ये पिंपळवंडी येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात शिवांजली भूमीपुत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन १९९२ मध्ये पुणे येथे बृहन महाराष्ट्र कॉलेज आँफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघटनेने पत्रकार वरुणराजे भिडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओतूर ग्रामस्थ व मित्र परिवाराने नागरी सत्कार करुन मानपत्र, पुणेरी पगडी व ५१ हजार रुपयांची थैली देऊन सन्मानित केले.
सन १९९७ पासून जुन्नर तालुक्याचे १० वर्षे सकाळ चे बातमीदार म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ओतूर चे काम ते पहात होते. त्यांनी आदिवासी भागातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविले तसेच पिंपळगाव जोगा धरणग्रस्तांसाठी ते लढले, अनेक विधायक उपक्रम त्यांनी राबविले. २५ पेक्षा जास्त रास्ता रोको, २५ वर्षे बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन, स्त्रियांसाठी तनिष्का व्यासपीठाची निर्मिती, अनाथ, आदिवासी मुलांसाठी आनंदयात्रेचे सलग ३० वर्षे आयोजन आणि अशा प्रकारचे अनेक विधेयक उपक्रम त्यांनी राबविले. शरीराचा डावा भाग पूर्णपणे लूळा पडलेला असताना देखील धडधाकट असल्याप्रमाणे धडाडीने त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. दुर्लक्षित परिसराच्या व समाजाच्या विकासाकरिता बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले हे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी अविनाश घोलप यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अवचट यांचा मित्र परिवार जयप्रकाश डुंबरे, सुनिल वैद्य, डॉ. भरत घोलप, शितोळे सर, शरद शेटे, ॲड. पानसरे, विजू कर्डिले आदि मान्यवर उपस्थित होते.