आंबेगाव तालुक्यासह पुणे जिल्हा,नगर ,येथील हिंदू-मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव) येथील श्री पीरसाहेब देवाची यात्रा (ऊरुस) मंगळवार दि. १७ ते गुरुवार दि. १९ असा तीन दिवस भरणार होती. पण यात्रेसाठी बाहेरून आलेल्या भाविकांमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन त्याचा फैलाव होऊ नये म्हणून वडगावपीर व मांदळेवाडी ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरस चे रुग्ण देशात अनेक ठिकाणी आढळून आले असून पुण्यातही कोरोनाचे ९ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अतिदक्षता म्हणून अनेक उपाययोजना करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी यांनी दिल्या असून त्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षता घेण्यासाठी आंबेगाव तालुक्यात वडगाव पीर येथे होणारा पिराचा उरूस (यात्रा) रद्द करण्यात आली आहे. आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गावच्या ग्रामस्थांची बैठक वडगावपीर येथे शुक्रवार दिः.१३ रोजी आयोजित केली होती. यावेळी मंचर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, वडगावपीरच्या सरपंच मिरा पोखरकर, मांदळेवाडीचे सरपंच कोंडीभाऊ आदक,हजरत दावल मलिक पीरदर्गा शरीफ ट्रस्टचे अध्यक्ष हनिफभाई मुजावर, उपसरपंच रविंद्र गुळवे, जायदाबी मुजावर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सावळेराम आदक, शांताराम सुर्यवंशी, पोपट राजगुडे, सचिन आदक, संतोष आदक, लिलाधर आदक, बापू आदक,ग्रामसेविका मनिषा काळे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी व बाहेरील भाविक भक्तांनी यात्रा रद्द झाल्यामूळे यात्रेसाठी येऊ नये असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते. जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.