अक्षय इंदोरे
इंदापूर जिल्हा पुणे येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री (राज्यमंत्री) ना. दत्तात्रय भरणे (मामा), महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत, इंदापूर पंचायत समितीच्या; लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांना मोफत हेल्मेट, डायरी, ओळखपत्र इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री भरणे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विशेष कौतुक केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा संघ असून, या संघमुळे पत्रकारांचे मनोबल उंचावले आहे. या संघाच्या वतीने पत्रकारांची विशेष काळजी घेतली जाते, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील पत्रकारांना हेल्मेट चे वाटप करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष नीलकंठ मोहिते, सरचिटणीस सागर शिंदे, आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ. समीर राजे, इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महारुद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील तसेच पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर नाना गलांडे, कार्याध्यक्ष जावेद मुलानी, तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ, यांच्यासह तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तब्बल सत्तर सदस्य व प्रेस फोटोग्राफर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना पत्रकाराने कुठल्याही नेत्याची भाटगीरी करता कामा नये. पत्रकाराने निष्पक्ष आणि निर्भीडपणे आपली भूमिका मांडत राहणे गरजेचे आहे. पत्रकारांमध्ये सरकार बनविण्याची आणि पाडण्याची टाकत असते. आपण समाजाला जबाबदार राहून कार्य करणे गरजेचे आहे असेही यावेळी ते म्हणाले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनीही यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. पत्रकारिता करत असताना पत्रकाराने कुठल्याही नेत्याची भाटगीरी करता कामा नये. पत्रकाराने निष्पक्ष आणि निर्भीडपणे आपली भूमिका मांडत राहणे गरजेचे आहे. पत्रकारांमध्ये सरकार बनविण्याची आणि पाडण्याची ताकत असते. आपण समाजाला जबाबदार राहून कार्य करणे गरजेचे आहे असेही यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मानही यावेळी करण्यात आला.