Skip to main content

छत्रपती संभाजी महाराज - देश, देव आणि धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा एकमेव राजा

विठ्ठल वळसे पाटील (जेष्ठ पत्रकार)८४८४०६६०४२




देव,देश आणि धर्म रक्षणासाठी क्रुरमय औरंगजेबाच्या ४० दिवस यातनामय शिक्षा भोगताना धर्मवीर शंभू राज्यांनी एक क्षणभरही रयतेच्या सुखाचा विसर होऊ न देता. आपले बलिदान केले. याच बलिदानाची प्रेरणा पुढे अटक ते कटक साम्राज्य विस्तारात झाली. 



 धर्मवीर शंभू राजांस औरंगजेबासमोर हजर केले तेंव्हा राजे आपला मित्र छंदोगामात्य कवी कलश यास काय काव्य सुचतंय म्हणताच कवी कलश म्हणतो  '' यावन रावण कि सभा संभू बंध्यो बजरंग | लहू लसत सिंदुरसम खूब खेल्यो रणरंग || जो रवी छबी  देखातही खद्योत होत बदरंग | त्यो तव तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||'' 



यवनरुपी रावणाच्या ( औरंगजेबाच्या ) सभे समोर रामभक्त बजरंगासारखे शंभू राजेंस बंधनात आणले आहे। रणरंग झाल्याने  रक्ताने माखलेले शरीर शेंदुरासम भासते आहे। सूर्योदय झाल्यावर  काजवे निस्तेज होतात, तसे शंभू राज्याचे तेज पाहुन औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे।। हे सारे वर्णन मृत्यू समोर असताना मृत्यूला हि भयभीत करणारा हा प्रसंग या प्रसंगाने घाबरलेल्या औरंगजेबाने कवी कलश यांची जीभ चैतन्याचे आदेश दिले. हि काव्य पंक्ती वढू येथील कवी कलश यांची समाधी जवळ रेखाटली आहे. 



हिंदुस्थानच्या भुमीवर परकीय आक्रमणां पेक्षा फ़ंदफ़ितुरी मुळे अनेक सत्ता पारतंत्र्यात गेल्या. हिच किड हिंदवी स्वराज्यात नांदत होती. वतनासाठी अनेकांनी मोगलांकडे स्वाभिमान गहाण ठेवला होता. मोगलांकडून रयतेची होणारी पिळवणूक, अत्याचार हि मंडळी उघड्या डोळ्यांनी पाहत होती. शिवशंभू नी रयतेचे राज्य निर्माण करून समृद्धी उभी केली पण याही स्वराज्याला फ़ंदफ़ितूरीचे ग्रहण लागले. आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्यास औरंगजेबाच्या हाती दिले. 



 धामधुमीचा काळ त्यात वतन मागणारे अनेक जण पुढे  नाराज मंडळी मात्र आत औरंगजेबाच्या पत्रव्यवहारातून औरंगजेबास भेटू लागली. यातूनच सह्याद्रीच्या कातळ व अवघड वाटा दाखून औरंगजेबाचे सैन्य दख्खनेत उतरवले. यातूनच १६८९ मध्ये शंभूराजें चा मेहुणा गणोजी शिर्के याने पन्हाळा भागात कवी कलशांवर हल्ला केला याची खबर मिळताच शंभूराजे समाचार घेण्यास निघाले हे समजताच शिर्के संगमेश्वरला आले त्यावेळी संभाजीराजांनी महत्त्वाच्या सरदारांची कोकणातील संगमेश्वरची बैठक बोलावली ती संपवून राजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर गुप्त हल्ला केला. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली.प्रयत्नां ची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. यात मुकर्रब खाना सी लढताना सरसेनापती मालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. दगाबाजीने फास आवळले गेले अखेर शत्रूने संभाजीराजांना व कवी कलशांना  १ फेब्रुवारी १६८९ रोजी जिवंत कैद केले.



बहादूर (धर्मवीर ) गडावर औरंगजेबा समोर शंभूराजे व कवी कलश  यांना हजर केले  सर्व किल्ले स्वाधीन , खजिना व धर्मांतर केल्यास जीवदान गोष्टी पुढयात टाकल्या पण स्वाभिमानी, धर्मनिष्ठ शंभूराज्यांनी गवताची काडी सुद्धा औरन्गजेबाज देणार नाही म्हणून स्वराज्य रक्षणासाठी या गोष्टी लाथाडल्या. पुढे शंभू व कवींची एका घाणेरड्या उंटावर उलटे बसवून, विदूषकाचे कपडे घालून धिंड काढण्यात आली.  कुराणाप्रमाणे शिक्षा फर्मावण्यात आली यावेळी दुतर्फा असलेल्या सैन्याने दगड व भाल्यांचा मारा केला. पुढे हा मुक्काम तुळापूर येथे हलवला. तुळापूर संगमावर तेजस्वी नेत्रकमल  काढण्यात आले त्यानंतर कवी कलश व शंभू राज्यांची जिव्हा छाटली. या घटनेने औरन्गजेबाच्या छावणीत आसुरी जल्लोष माजला होता.  शेवटाला तेजोमय शरीराची कातडी सोलली गेली व वीतभर तुकडे करून परिसरात फेकले गेले . असा ४२ दिवसांचा यातनामय  प्रवास शंभू राजे व कवी कलशांनी सोसला पुढे वढु येथे शरीराचे तुकडे गोळा केले गेले त्यावर अग्नि संस्कार देण्यात आला. त्या ठिकाणी शंभूराजे व कवी कलशांची समाधी बांधण्यात आली. पुढे हीच बलिदानाची गाथा मराठा साम्राज्य विस्ताराची प्रेरणा ठरली. धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणा साठी आपला देह बलिदान केला. असे बलिदान जगाच्या पाठीवर कुठलेच नाही. ४२ दिवसांच्या यातनामय प्रवासातून  बलिदान झाले त्यावेळी फाल्गुन आमवस्याचा दिवस ( ११ मार्च १६८९) होय. राष्ट्रअभिमानी युवाशक्ती अमावस्येचा दिवशी संभाजी महाराजांच्या वढु बु. ता. शिरूर, व तुळापूर ता. हवेली, पुणे येथे समाधीस्थळी नतमस्तक होवून ऱ्हदयात प्रेरणा ज्योत अखंडीत करतात   



 शंभूराजे हे स्वराज्य रक्षक तर होते या शिवाय विविध पैलूंचा ते रथ होते ते एक महान योद्धा होते हिंदुत्वाचे महान रक्षक होते. १४० तब्बल लढाया जिंकणारा अपराजीत, संस्कृत पंडित, १४ भाषेंवर प्रभुत्व गाजवणारा १४ व्या वर्षी बुधभुषण, नखशिखा, सातसतक ग्रंथ लिहिणारा राजा जगातला एकमेव अद्वितिय होत.  जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा, जगातील पहिला तरंगता तोफखाना, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा, आदिलशाही, कुतुबशाहीची बरोबर  सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना बरोबर मोघलांचा कर्दनकाळ ठरला. दुष्काळ ग्रस्त गावांत  जल नियोजन, उत्तरप्रदेश, तामिळनाडू , कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा, इतर धर्मांचा सन्मान, धर्मांतरावर कायदेशीर बंदी , बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा,  देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा शेतीसाठी पीक कर्ज योजना, सैनिकांच्या उत्पन्नाला चरईची सवलत,  सुसज्ज आरमार निर्मिती, आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र जपला.या सर्व गोष्टी पार पडत असताना आपल्या बलिदानातून धर्मनिष्ठा ,राष्ट्रनिष्ठा, जाज्वल बलिदान, मृत्यूवरही विजय प्राप्त करणारा धर्मवीर ठरला.


पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...