विठ्ठल वळसे पाटील (जेष्ठ पत्रकार)८४८४०६६०४२ देव,देश आणि धर्म रक्षणासाठी क्रुरमय औरंगजेबाच्या ४० दिवस यातनामय शिक्षा भोगताना धर्मवीर शंभू राज्यांनी एक क्षणभरही रयतेच्या सुखाचा विसर होऊ न देता. आपले बलिदान केले. याच बलिदानाची प्रेरणा पुढे अटक ते कटक साम्राज्य विस्तारात झाली. धर्मवीर शंभू राजांस औरंगजेबासमोर हजर केले तेंव्हा राजे आपला मित्र छंदोगामात्य कवी कलश यास काय काव्य सुचतंय म्हणताच कवी कलश म्हणतो '' यावन रावण कि सभा संभू बंध्यो बजरंग | लहू लसत सिंदुरसम खूब खेल्यो रणरंग || जो रवी छबी देखातही खद्योत होत बदरंग | त्यो तव तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||'' यवनरुपी रावणाच्या ( औरंगजेबाच्या ) सभे समोर रामभक्त बजरंगासारखे शंभू राजेंस बंधनात आणले आहे। रणरंग झाल्याने रक्ताने माखलेले शरीर शेंदुरासम भासते आहे। सूर्योदय झाल्यावर काजवे निस्तेज होतात, तसे शंभू राज्याचे तेज पाहुन औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे।। हे सारे वर्णन मृत्यू समोर असताना मृत्यूला हि भयभीत करणारा हा प्रसंग या प्रसंगाने घाबरलेल्या औरंगजेबाने कवी कलश यांची जीभ चैतन्याचे आदेश...
समर्थ भारत माध्यम समूह