घोडेगाव प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये विज्ञान शिक्षक श्री.सुरेश बांगर व प्रयोगशाळा सहाय्यक श्री.गुलाब बांगर यांच्या मार्दर्शनाखाली 25 विद्यार्थ्यांनी सौर दिव्यांची निर्मिती केली.सौर दिव्यांच्या जोडणीसाठी सोलर पॅनल,सौर विद्युतघट,एल ई डी बल्ब यांचा वापर करण्यात आला.
मंचर येथिल श्रेया अँग्रो कंपनी व प्रफुल्ल अँकडमीचे श्री गोकुळशेठ बेंडे पाटील यांनी सोलर दिवे बनविण्यासाठी सुमारे पंधरा हजार रूपये किमतीचे साहित्य पुरविले.श्री.गोकुळशेठ बेंडे पाटील यांनी सौर उर्जेचा वापर वाढावा,उर्जेची बचत व्हावी, प्रदुषण होऊ नये म्हणून सौर उर्जेचा स्वच्छ स्ञोत वापरावा या बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजाग़ती केली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अविनाश ठाकूर यांनी सौर दिव्यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी कसा करावा व त्यामुळे विज्ञान शिकण्यासाठी त्यांची आवड वाढत असल्याचे मार्गदर्शन केले.
श्रीमती अलकाताई बेंडे व सौ.सुमनताई बेंडे यांच्याहस्ते विद्यालयातील 25 गरजू विद्यार्थ्यांना सौर दिव्यांचे वाटप केले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.अनंता लोहकरे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र अरगडे यांनी केले.