प्रमोद दांगट : प्रतिनिधी
शाळेतील आठवणींना उजाळा देत जीवन शिक्षण मंदिर वाफगाव व रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयातील माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सन 2004 इयत्ता 4 थी व सन 2000 इयत्ता 10 वी मधील शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षक या मेळाव्यात सहभागी झाले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या शिक्षकांप्रती आदर आणि त्यांना व एकमेकांना भेटण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
सर्व शिक्षकांची गावातील मुख्य चौकातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सर्वांचे औक्षण, परिपाठ व स्वागतगीताने कार्यक्रमला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना हिरामण वाघोले यांनी विद्यार्थी शिक्षक मेळाव्याची गरज असून हा मेळावा आमच्या आयुष्यास नवसंजीवनी देणारा आहे. हा दिमाखदार सोहळा कायम स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त केले. नानासाहेब शेवाळे यांनी शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम या विद्यार्थ्यांनी या केले. असे सांगितले.
त्यावेळचे 10 वी चे वर्गशिक्षक शिवाजी दूंडे म्हणाले की, या मेळाव्याच्या अयोजनामुळे इतर माजी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
या वेळी व्यासपीठावर प्राथमिक शाळेतील माजी शिक्षक गणेश बैरागी, उषा पाचारणे, आशालता भागवत व रयत मधील माजी शिक्षक भगवान पाटोळे, रावसाहेब लोंढे, रामचंद्र माळी, शिवाजी वाघमारे, शहाजी लांडगे, शिवाजी, तुकाराम फाळके, लक्ष्मण रोडे, राजेंद्र पाटील, उदयकुमार सांगळे, महादेव पवार, ज्ञानेश्वर सुर्वे, सुनिल घुमटकर, जलवंती निघोट तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुतार, मुलाणी, चासकर उपस्थित होते. या सर्वांचा श्रीफळ, स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख पंचवीस हजारांची देणगी विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दिली होती या वेळीही प्राथमिक शाळेसाठी सांस्कृतिक सभा मंडप व माध्यमिक शाळेसाठी सुसज्ज पाण्याची टाकी बांधून देण्याचे जाहीर केले. या वेळी संतोष जाधव, संदिप गायकवाड, सचिन कालेकर, सुभाष नेटके, सचिन गोरडे, सोमेश्वर वाफगावकर, पांडुरंग सुतार, संतोष सोनवणे, धनश्री नारगोलकर, विनायक शिंदे, सतिश टाकळकर, अजय रोकडे, दशरथ गार्डी, सोपान कांबळे या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रस्ताविक सीमा तांबे यांनी केले. सुत्रसंचालन विजय कराळे यांनी तर अभार मनिषा कांबळे यांनी मानले.