आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पुजन झी टी.व्ही. वरील ‘मराठी पाऊल पडते’ पुढे या कार्यक्रमातील सिनेकलावंत श्री.मारुती करंडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी वाडःमयातील नाटक वाडःमयाचा प्रसार व्हावा म्हणून विद्यालयामध्ये एकपात्री नाटककार श्री.मारुती करंडे पाटील यांचा “धम्माल एका लग्नाची” या एकपात्री नाटकाचा एक हजार दोनशे एकोणऐंशीवा प्रयोग साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय व जि.प.प्राथ.शाळेतील 400 विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील वऱ्हाड शहरी भागात लग्नासाठी जाताना होणाऱ्या अनेक गमती-जमती श्री.करंडे पाटील यांनी विविध प्रकारच्या अठ्ठ्यांनव पात्रांच्या भूमिका साकारुन विद्यार्थ्यांना हास्यरसाची परिचय करुन दिला. या कार्यक्रमामध्ये मोटर सायकल, विविध संगितांचे आवाज व पशु-पक्षांचे हुबेहुब आवाज काढून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यु ट्युब चॅनेलवर हा प्रयोग उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तो आवर्जुन पहावा असे त्यांनी आव्हान केले.
मराठी भाषा दिनानिमित्त इ.9 वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे वर्गशिक्षक श्री.अनंता लोहकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाची व्यवस्था श्री.सुरेश बांगर, सौ.वैशाली काळे, सौ.मनिषा आढळराव, सौ.वंदना मंडलिक, श्रीम. कविता ढेरंगे, सौ.लक्ष्मी वाघ यांनी पाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अनंता लोहकरे यांनी व आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र अरगडे यांनी केले.