मंचर येथे एकाचा खून केल्याप्रकरणी दोघांना अटक
मंचर (गांजाळेमळा )येथून तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह गांजाळेमळा येथील विहिरीत आढळला होता या घटनेची माहिती मिळतात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता मात्र या विहिरीत पडलेल्या व्यक्तीचा घराच्या जागेच्या वादातून खून झाला असल्याचे समोर आले आहे याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गांजाळेमळा येथील एका विहिरीत नवनाथ धोंडीभाऊ गांजाळे (वय वर्ष ४२ राहणार गांजळेवस्ती मंचर) याचा मृतदेह सापडला होता. तो काही दिवसापूर्वी बेपत्ता झाल्याची फिर्याद मंचर पोलीस ठाण्यात सोमवार दि १७ रोजी त्याच्या कुटूंबियांनी दाखल केली होती.त्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही .व दि १८ रोजी त्याचा मृतदेह वाडीतील विहिरीत आढळून आला त्यानंतर मंचर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबियांच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर त्याच्या कुटूंबियांना कळले की मयत नवनाथ गांजाळे यांचा घराच्या जागेवरून दि ,१६ रोजी वाडीतीलच सचिन एकनाथ गांजाळे,(राहणार गांजाळेमळा)व त्याचा मित्र विनोद केरभाऊ तांबडे (राहणार तांबडेमळा,अवसरी)याच्याशी वाद झाला होता या वादावरून नवनाथ ला त्या दोघांनी दगडाने मारहाण करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला विहिरीत टाकण्यात आले होते.ही माहिती कळताच मयत नवनाथ गांजाळे यांचा भाऊ अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी करून सचिन गांजाळे, विनोद तांबडे यांना अटक केली आहे याबाबत अंकुश गांजाळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहे.