निरगुडसर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात रांजनी कारफाटा येथे कॉलेज ला जाण्यासाठी बस ची वाट पाहत असलेल्या विवाहित तरुण महिलेचा तिथल्याच गावातील राहुल भोर याने बस स्टॉपवर येत चल तुला कॉलेज ला सोडतो,व तू मला आवडते असे म्हणत व वारंवार तिला फोन करून त्रास देत या महिलेची छेडछाड केली असल्याची घडला काही महिन्यापूर्वी घडली होती मात्र आरोपी नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होऊ नहे म्हणून याबाबत महिलेने कुणालाही सांगितले न्हवते मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने महिलेने मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी राहुल भोर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा या महिलेच्या नात्यातील असून तो अनेक दिवसांपासून या महिलेला वारंवार फोन करून जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता.फिर्यादी महिला ही कॉलेज मध्ये शिक्षण घेत असून ती काही दिवसापूर्वी कॉलेजला जाण्यासाठी रांजनी कारफाटा येथे बस स्टॉप वर उभी राहिली असता राहुल उदय भोर हा आपली गाडी तिथे घेऊन आला व चल तुला कॉलेजला सोडतो असे म्हणाला व पाठलाग करून त्रास देऊ लागला आरोपी हा नात्यातील असल्याने कौटुंबिक वाद होईल म्हणून या महिलेने या गोष्टीबद्दल कुणालाही सांगितले नाही मात्र आरोपी तिला फोनवर वारंवार त्रास देऊ लागला ,तिचा मानसिक त्रास पाहून तिच्या पतीने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला व तिचा पती व महिलेने मंचर पोलीस ठाण्यात दि,२१/२/२०२० रोजी फिर्याद दिली.या प्रकरणी राहुल भोर(वय २५) राहणार रांजनी ता ,आंबेगाव,पुणे याच्याविरोधात मंचर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३५४ ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अलंकेश्वर भोसले करीत आहेत.