जवळे (ता.आंबेगाव )येथील लायगुडे मळा येथे एकाच रात्रीत एका तरुणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असून एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तुषार सोपान लायगुडे (वय २५) व निशा सावकार लायगुडे (वय ४५ ) दोघेही राहणार जवळे लायगुडेमळा ता,आंबेगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे व महिलेचे नाव आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तुषार लायगुडे यांनी बुधवार दि २६ रोजी पहाटे दिडच्या सुमारास मळ्यातील चिंचेच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.रात्री दोन वाजता लोकांची गर्दी झाली असता या घटनेबाबत त्याच्या कुटूंबियांना कळाले गावचे पोलीस पाटील रवींद्र लोखंडे यांनी याबाबत मंचर पोलिसांना कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून तुषार ला खाली घेऊन रुग्णवाहिकेद्वारे त्याला मंचर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तो तपासण्या पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले या बाबत दिलीप बबन लायगुडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तर याच मळ्यातील निशा सावकार लायगुडे (वय ४५)या महिलेने बुधवारी पहाटे विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.सकाळी त्यांच्या घराशेजारील नंदा संतोष लायगुडे या जनावरांसाठी चारा आनण्यासाठी शेतात जात असताना त्यांना विहिरीत काहीतरी तरंगत असल्याचे दिसले त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात विहिरीत कोणीतरी महिला बुडून तरंगत असल्याचे दिसले त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. याबाबत पोलीस पाटील यांनी मंचर पोलिसांचा कळविले असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देत महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वर काढत मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी महिलेला तपासून ती मयत झाली असल्याचे सांगितले याबाबत नंदा संतोष लायगुडे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकलेश्वर भोसले पोलीस नाईक राजेंद्र हिले करत आहेत.