मंचर प्रतिनिधी
मंचरमधील पोदार जम्बो किड्स, मंचर ह्या प्रीप्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलचा विविध गुणदर्शन कार्यक्रम विघ्नहर मंगल कार्यालय, पिंपळगाव फाटा मंचर या ठिकाणी उत्साहात पार पडला. त्यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या मा.अरुणाताई थोरात, सौ. आशादेवी बाणखेले, ग्रा.पं. सदस्या माणिकताई गावडे, सविता क्षीरसागर, शोभा रणदिवे, महाराष्ट्र राज्यस्तरीय इंग्रजी शैक्षणिक साहित्यपेटी समिती सदस्य श्री.शरद दळवी , खेड पंचायत समितीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेती अधिकारी श्री.संजय फल्ले, आदर्श माता सौ.कमलताई शिंदे, सेंटरहेड सौ. शैला फल्ले इ. मान्यवर उपस्थित होते. ह्यावर्षी स्कूलने "खेल खेले जम्बो के संग" या विषयाला अनुसरुन कार्यक्रम सादर केले.
या वेेेली संचालिका स्वाती वत्स यांचा मार्गदर्शनपर व्हिडोओ प्रथम दाखवला. तसेच फुटबाॅल, खो-खो, क्रिकेट, मार्बल(गोट्या), बॅडमिंटन, व्यायाम, लावणी, सोलो डान्स, असे नृत्यकलाविष्कार छोट्या विद्यार्थ्यांनी सादर करुन सभागृहात आनंदयात्रा घडवली. मुलांच्या माता पालकांच्या बहारदार नृत्याच्या कार्यक्रमाला प्रेक्षकवर्गाचा छान प्रतिसाद मिळाला.
यांत सौ. शैला फल्ले यांनी प्रास्ताविक सादर केले. पालक प्रतिनिधी व स्त्रीरोगतज्ञ डाॅ. सौ. मधुरा शेटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सौ. अरुणाताई थोरात, सौ.आशादेवी बाणखेले व श्री.शरद दळवी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील वर्षभराच्या विविध यशस्वी उपक्रमांबद्दल शाळेला भरभरुन धन्यवाद व शुभेच्छा दिल्या.
सौ.पूनम फल्ले व सौ.सोनल पारेख यांच्या प्रभावी सूत्रसंचालनामुळे रंगत वाढली. सौ.आशा घोडे, सौ.सावित्री बिराजदार, सौ.शीतल रोकडे, सौ.हेमा देठे व देवकी भारमळ यांनी कार्यक्रम उत्कृष्ठ होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. श्री. अमोल फल्ले यांनी शिक्षक व सर्व पालकांचे विशेष आभार मानले.