डिंभे-प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयुकाद्वारे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत कु.सिद्धेश अविनाश दराडे. (जगदीशचंद्र महिंद्र हायस्कुल चिंचोली, ता.आंबेगाव, जि. पुणे. या विध्यार्थ्यांने ग्रामीण भागातील मुलांमध्ये चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ग्रामीण भागातील आंबेगाव तालुक्यात १ फेब्रुवारी २०२० रोजी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी ।।खु ।। या ठिकाणी चित्रकला, निबंध व प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.ग्रामीण भागातील विविध शाळांमधून सुमारे २५० हुन अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांना २२ फेब्रुवारी २०२० रोजी आयुका पुणे या ठिकाणी आयुकाचे संचालक मा.श्री.सोमक रायचौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी आयुकाचे शास्त्रज्ञ सुहृद मोरे, संपर्क अधिकारी समीर धुरडे, वैज्ञानिक सहायक निलेश पोखरकर आणि विविध शास्त्रज्ञ उपस्तीत होते.