---------------------------------------------------------------
ग्रा.प सदस्य दत्ताराम वैद्य यांचा अनोखा उपक्रम
---------------------------------------------------------------
पारगाव, वार्ताहर, दि २४
पारगाव तर्फे अवसरी बु.(ता .आंबेगाव)येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद यांनी गावातील कोणत्याही दांपत्यास प्रथम कन्यारत्न प्राप्त झाल्यास त्या मुलीच्या नावे ५००० रु रक्कम मुलीचे १८ वर्ष पुर्ण होईपर्यंत मुदत ठेव म्हणुन ठेवणार आहे.या मुलीचे १८ वय पुर्ण झाल्यावर ही रक्कम २७०९८ रु होणार असुन या योजनेचे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे.आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत दीड महिन्यात प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या पारगाव येथील सहा मुलींच्या नावे प्रत्येकी रक्कम ५००० रुपयाची ठेव पावती करून दिली आहे.
मंगळवार दि १८ फेब्रुवारी रोजी तनिष्का मंगल कार्यालय पारगाव(ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रसाद ढोबळे यांस प्रथम कन्यारत्न झाल्याबद्दल पाच हजार रुपये मुदत ठेव पावतीचे वितरण करण्यात आले
या वेळी ग्रा.प.सदस्य किरण ढोबळे, वि .वि. सोसायटीचे माजी चेरमन दत्तात्रय वाव्हळ, धोंडिबा दातखिळे,बजरंग देवडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्याम बारगळ ,शाळेचं मुख्याध्यापक संतोष लबडे इ मान्यवर ,विद्यार्थी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योजनेसाठी गावातील प्रथम कन्यारत्न प्राप्त झालेल्या दांपत्यांनी संपर्क साधावा असे आवाहन वैद यांनी केले.