आदिवासी दुर्गम भागातील अतिशय खडतर अशा प्रसंगाना सामोरे जात एम. ए. चे शिक्षण पूर्ण करुन सेटच्या अर्थशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेला प्रविण पारधी याने आपले दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा फुलवडे येथे येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणांचे महत्व पटवून देताना आपल्या शिक्षणाविषयी जीवनात आलेले अनेक प्रसंग, अनुभव विद्यार्थ्यांना सांगून इयत्ता दहावीच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालक व शिक्षक देखील डोळे ओले करत भारावून गेले.
या कार्यक्रमप्रसंगी त्यांच्या सोबत फुलवडे गावचे आकाश मोहरे यांनीसुध्दा एम. ए. चे शिक्षण पूर्ण करुन नेटच्या राज्यशास्त्र विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना आभ्यासाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव मारुती नंदकर हे होते.
दहावीच्या या शुभचिंतन सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना अनेक विविध प्रसंगातून आनंदातून शिक्षण मिळविण्याच्या वाटा समजून सांगितल्या. माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभचिंतन सोहळा उत्साहपूर्वक वातावरणात पार पडल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.
या शुभचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून आश्रमशाळेतील सहशिक्षक अविनाश घोलप यांनी आपली मुलगी ऋतुजा हीने सी. ए. फाऊंडेशन परीक्षेत भारतात १८ वा क्रमांक मिळविल्याबद्दल आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक तसेच उपस्थित मान्यवर यांना स्वादिष्ट भोजनाची मेजवानी दिली. त्याबद्दल अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान फटांगरे, सुनिल पोटे, अधिक्षिका सविता पोटकुले, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे सुत्रसंचालन सचिन म्हस्के यांनी केले तर गोविंद बोंबे यांनी आभार मानले.
मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते. जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.