मंचर येथील लोंढे मळ्यातीळ उसाला आग लागण्याची ही तिसरी वेळ. ग्रामस्थांची वीज वितारण कंपणीविरोधात तीव्र नाराजी.
आंबेगाव तालुक्यातील मंचर-लोंढेमळा येथे महावितरण कंपनीच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल १२ एकर क्षेत्रातील ऊस जळुन खाक झाला असून संबधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऊस जळाल्याची घटना सोमवार दि.२४ रोजी दुपारी घडली. यापूर्वीही दोन वेळा याच क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळल्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांनी शेतातील विजेचे खांब हटविण्याची मागणी केली आहे. दरम्यान भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जळालेला ऊस गाळपासाठी तातडीने नेला जाईल.अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.
दरम्यान शॉर्टसर्किट मुळे उसाला आग लागणे हे नेहेमीचेच झाले आहे आणि या प्रकाराला सर्वस्वी महावितरणच जबाबदार आहे. अनेक वेळा तक्रार करूनही महावितरण या प्रकारविषयी गंभीर नसल्याने तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री ना. दिलीपराव वळसे यांनी या प्रकारात लक्ष घालावे अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे. के. थोरात यांनी केली आहे.
लोंढेमळा येथील शेतकरी किसन माशेरे ३० गुंठे,अरुण लोंढे एक एकर,विकास खानदेशे दिड एकर,जालिंदर लोंढे दिड एकर,कमलेश लोंढे ३० गुंठे,राधा माशेरे १० गुंठे,मालुबाई लोंढे दिड एकर,लक्ष्मीबाई लोंढे अर्धा एकर,यमुनाबाई लोंढे ५० गुंठे,चंद्रकांत खानदेशे ३० गुंठे, निवृत्ती खानदेशे एक एकर, दत्तात्रय माशेरे एक एकर, अनिल लोंढे एक एकर असे एकुण १२ एकर २५ गुंठे क्षेत्रातील ऊस जळाला आहे.घटनास्थळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब थोरात, सिताराम लोंढे, सामाजिक कार्यकर्ते जे.के.थोरात, माजी सरपंच अश्विनी शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष विकास खानदेशे, रामराव खानदेशे, भीमाशंकर कारखान्याचे कर्मचारी जे.बी.भोर, व्ही.व्ही.पालेकर, एस.व्ही.गुंजाळ, एन.जी.वायाळ यांनी भेट देवुन पाहणी केली.