केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत सी.ए.ए. आणि प्रस्तावित एन.आर.सी. बाबत राजधानी दिल्ली व पूर्वतर राज्यामध्ये असंतोष उफाळून आला असून त्याचा परिणाम मंचर सारख्या शहरांमध्ये होऊ नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी मंचर व मंचर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी आव्हान केले की याबाबत कुणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच असे कुणी आढळून आल्यास त्यांचे नंबर नाव मंचर पोलीस ठाणे मध्ये पोहोचवा पोचवण्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, कुठल्याही परिस्थितीत समाजात दुफळी निर्माण होता कामा नये मंचर शहर व परिसरात नेहमीच हिंदू व मुस्लिम एकत्र सण साजरे करतात, गणपती व ईद या दोन्ही सणांमध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांचे ऐक्य पाहण्यासारखे असते, यांच्यात दुफळी निर्माण होण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्न करत असतील त्यांचे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे, त्यासाठी आमचे मोठ्याप्रमाणावर गुप्त बातमीदार सर्वत्र फिरत असून समाजाने सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान श्री टोम्पे यांनी केले,यावेळेस मंचर चे सरपंच दत्ता गांजाळे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस उपनिरीक्षक राहुल लाड, माजी उपजिल्हाप्रमुख संतोष बाणखेले, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख कल्पेश बाणखेले, वसंत बाणखेले, आशिष पुंगलिया, मुन्ना शेख, आली मंसूर खान पठाण, प्रवीण मोरे, अजय घुले, भगीरथ जाधव,आदी उपस्थित होते